राम विश्वामित्रांसोबत गेले
एक दिवस विश्वामित्र ऋषि अयोध्येला आले. त्यांच्या यज्ञकार्यात विघ्न आणणाऱ्या असुरांना ठार मारण्यासाठी, राम लक्ष्मणास त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याच्या हेतूने ते दशरथाकडे आले होते .दशरथाची द्विधा मनःस्थिती पाहून रामाने म्हटले की ऋषिमुनींची मुक्तता करण्यासाठी त्यांनी हा देह धारण केला आहे.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगावे- आपण प्रभु श्रीरामांसारखे इतरांना सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे.
अंतर्भूत मूल्ये -“परोपकारार्थमिदं शरीरं” हा स्थूल देह इतरांच्या कल्याणासाठी आहे.
विश्वामित्रांनी राजाला शब्द दिला की त्यांचे कार्य पूर्ण झाल्यानंतर ते राम लक्ष्मणा अयोध्येला परत पाठवतील. दशरथाची अनुमती घेऊन राम आणि लक्ष्मणानी विश्वामित्रांसोबत प्रस्थान केले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत
प्रभु श्रीरामासारखे आपण कोठेही बाहेर जातांना आगोदर नेहमी पालकांची परवानगी घेतली पाहिजे.
अंतर्भूत मूल्ये – आज्ञाधारकता व पालकांप्रती आदर.
लवकरच ते शरयू नदीजवळ पोहोचले. विश्वामित्रांनी त्यांना बल आणि अधिबल हे धोके आणि व्याधींपासून संरक्षण देणारे दोन मंत्र शिकवले. लवकरच ते एका घनदाट जंगलामध्ये पोहोचले. तेथे ताटकी नावाची यक्षिणी तिच्या मारीच नावाच्या पुत्रासह राहत होती. विश्वामित्रांनी रामाला सांगितले की त्याने ह्या दुष्ट राक्षसीचा नाश करण्यात कोणतेही पाप वा चूक नाही. तिचा नाश केल्याने अनेकांची विध्वंसक हातांमधून सुटका होईल. रामाने तात्काळ राक्षसीबरोबर युध्द आरंभले आणि अखेरीस,रामाने तिच्या छातीवर एक अचूक बाण मारला. त्यासरशी ती जमिनीवर पडली व तिने प्राण सोडले. विश्वामित्रांनी त्यांची सर्व शस्त्रास्त्रे रामाच्या स्वाधीन केली आणि त्याला सांगितले की तोच ह्या शस्त्रास्त्रांचा स्वामी आहे व ती त्याच्या आज्ञेचे पालन करतील. विश्वामित्रांनी यज्ञाचा आरंभ केला. राम आणि लक्ष्मणानी पाच दिवस कडक जागता पहारा ठेवला. सहाव्या दिवशी मारीच आणि सुबाहु इतर राक्षसांना घेऊन यज्ञामध्ये विघ्न आणण्यासाठी तेथे आले. परंतु राम आणि लक्ष्मणांपुढे त्यांचे सामर्थ्य फिके होते. रामाने मारीचाच्या दिशेने मनसास्त्र सोडले.त्याच्या प्रभावाने तो शेकडो मैल दूर फेकला गेला. सुबाहुवर अग्निअस्त्र सोडले व त्याचे तात्काळ प्राणोत्क्रमण झाले. विश्वामित्रांचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन राजपुत्रांना आशीर्वाद दिले.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत.
रामासारखे आपण नेहमी आपल्या शिक्षकांचे आणि वडीलधाऱ्यांचे ऐकले पाहिजे व ते जे सांगतात त्याचे अनुसरण केले पाहिजे. गुरुंच्या आज्ञेचे पालन केल्याने आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात.
अंतर्भूत मूल्ये- गुरु आणि वडीलधाऱ्यांप्रती आज्ञाधारकता आणि आदर.
एक युवा’ शिष्य काही भूर्ज पत्रे घेऊन आला. त्यावर काही मजकूर लिहिला होता. त्यानी तो वाचून दाखवला की मिथिलेचे महाराज यज्ञ समारंभ करू इच्छीतात. ज्यासाठी विश्वामित्रांनी शिष्यांसह उपस्थित राहावे अशी त्यांची इच्छा आहे. सर्वांनी त्या निमंत्रणाचे स्वागत केले परंतु रामाला अयोध्येस परत जायचे होते. विश्वामित्र रामाला म्हणाले की त्यांनी ते दोन्ही राजपुत्रांना स्वतः अयोध्येला घेऊन येतील असे दशरथाला वचन दिले होते. रामाने त्यांचे म्हणणे स्वीकारले. राम आणि लक्ष्मण दोघांना घेऊन विश्वामित्रांनी मिथिला नगरीकडे प्रस्थान केले. राजा जनक ह्यांच्याकडे भगवान शिवाने दिलेले धनुष्य असल्याचे रामाने विश्वामित्रांकडून ऐकले. महाराज त्याची दररोज पूजा करत व आजपर्यंत कोणीही त्याला प्रत्यंचा लावू शकले नाही. दोन्ही राजपुत्रांसोबत विश्वामित्र मिथिला नगरीत पोहोचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दोघा राजपुत्रांना पाहून महाराज जनक अत्यंत आनंदित झाले. स्वर्गातून भूतलावर आलेले दिव्य तेजाचे मूर्तिमंत रूपच त्यांच्यासमोर उभे राहिल्यासारखे त्यांना वाटले. शिवधनुष्य यज्ञमंडपामध्ये नेण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली