श्रीराम अयोध्या सोडून जातात
समस्त अयोध्या नगरी शोकसागरात बुडाली. राम, लक्ष्मण सीता,तिघांनीही अयोध्या सोडली. सुमंतानी स्वतः सारथ्य करुन रथामधून त्यांना सोडले. सुमंताचीही रामासोबत चौदा वर्ष वनात जाण्याची इच्छा होती परंतु रामाने मान्य केले नाही.
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावित.
जर तुम्ही चांगले असाल तर, तुमच्या प्रेमळ आणि चांगल्या स्वभावामुळे सर्वजण तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमचा आदर करतात.
अंतर्भूत मूल्ये -हिरो बना, झिरो नको (मूल्याधिष्ठित व्यक्ती सच्चा हिरो (नायक) आहे.)
अखेरीस ते गंगेच्या तीरावर पोहोचले. काही नावाडयांनी राजरथ पाहिला आणि ते त्यांचा मुखिया,गुह ह्याच्याकडे धावत गेले. गुहाने त्याच्या सर्व लोकांना गोळा करुन तो फुले आणि फळे घेऊन रामाचे स्वागत करण्यासाठी गेला. त्याने रामाला त्याच्या घरी पाहुणचार घेण्यासाठी आमंत्रित केले परंतु रामाने त्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सुमंतांना निरोप दिला. आणि गुहाने त्यांना नदी पार करुन भरद्वाज ऋषींच्या आश्रमात सोडले. रामाने गुहाला त्याच्या लोकांकडे परत जाण्यास सांगितले. अखेरीस ते वाल्मिकींच्या आश्रमात पोहोचले. वाल्मिकींच्या सल्ल्यानुसार रामाने वास्तव्य करण्यासाठी चित्रकूट पर्वतावरील एक सुंदर स्थान निवडले. तेथे राम आणि सीतेच्या सहाय्याने लक्ष्मणाने एक पर्णकुटी बांधली. तेथे राहणारे साधु,संन्यासी रामाच्या दर्शनासाठी गेले.
गुरुंनी मुलांना स्पष्ट करुन सांगावे आणि अंतर्भूत मूल्ये त्यांच्या मनावर बिंबवावीत
अवतार असूनही रामानी पर्णकुटी बांधण्याच्या कार्यात सहभाग घेतला. ते निष्क्रिय राहिले नाहीत.
(येथे गुरु मुलांना हे पण सांगू शकतात की आपल्या कल्याणासाठी स्वामी दर्शन देणे, पत्र स्वीकरणे, योजनांवर देखरेख करणे इ. कार्यांमध्ये दिवसरात्र कसे व्यस्त राहत असत)
राजवैभवात राहण्याची सवय असणाऱ्या लक्ष्मण आणि सीतेने, रामवरील आत्यंतिक प्रेमामुळे आणि रामापासून दूर राहण्याचा विचारसुद्धा सहन करु शकत नसल्यामुळे, स्वतःहुन राजवैभव त्याग केला व अत्यंत कष्टप्रद १४ वर्षांचा वनवास पत्करला.
अंतर्भूत मुल्ये- सर्व प्रथम कर्तव्य /प्रेम आणि त्याग ह्यानी कौटुंबिक नात्यांची पायाभरणी केली पाहिजे.