शबरीला मोक्ष
राम आणि लक्ष्मण ह्यांनी दक्षिणेकडे प्रयाण केले. लवकरच त्यांची शबरी नावाच्या एका वयोवृध्द पावन स्त्रीशी भेट झाली. तिचे गुरु मातंग ऋषिंनी त्यांच्या मृत्यू आगोदर तिला रामाच्या आगमना विषयी माहिती दिली होती व त्यानुसार ती रामाची प्रतीक्षा करत होती. रामाला पाहून शबरी म्हणाली , ” हे श्रीरामा , हे प्रभु,माझ्या गुरुंच्या इच्छेची परिपूर्ती झाली आहे. येथून माझी झोपडी अगदी जवळच आहे. आपण माझ्या झोपडीत पायधूळ झाडून ती पावन करावी.” असे म्हणून शबरीने रामाच्या चरणी लोटांगण घातले. रामाने तिच्या झोपडीत प्रवेश केल्यानंतर शबरीच्या अंगात उत्साह संचारला नदीवर जाऊन तिने त्याच्यासाठी शीतल जल आणि फळे आणली. रामासाठी आणलेलं प्रत्येक फळ (बोर ) तिने चाखून पाहिले व त्यातील फक्त मधुर फळं तिने रामाला अर्पण केली. तिचा भक्तिभाव,समर्पण आणि प्रेम पाहुन रामाला अती आनंद झाला व त्यानी तिला म्हटले,” माते! मी केवळ भक्तिचा भुकेला आहे, बाकी सर्व दुय्यम आहे. प्रेमाने ओथंबलेल्या भक्तिच्या माधुर्याचा मी आस्वाद घेतो.”
गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून , अंतर्भूत मूल्ये त्यांच्या मनावर बिंबवावीत.
जेव्हा तुम्ही प्रेमपूर्वक प्रार्थना कराल आणि अत्यंत प्रेमाने तुमची सर्व कर्तव्यकर्म कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या स्वतःच्या निवासस्थानी म्हणजेच तुमच्या हृदयात तुम्हाला दर्शन देईल.
अंतर्भूत मूल्ये- शुध्द आणि परमेश्वराप्रती असणाऱ्या प्रेमाने ओथंबलेल्या हृदयातून प्रार्थना उद्भवली पाहिजे.
[जेव्हा तुम्ही प्रेमपूर्वक प्रार्थना कराल आणि अत्यंत प्रेमाने तुमची सर्व कर्तव्यकर्म कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या स्वतःच्या निवासस्थानी म्हणजेच तुमच्या हृदयात तुम्हाला दर्शन देईल.
अंतर्भूत मूल्ये- शुध्द आणि परमेश्वराप्रती असणाऱ्या प्रेमाने ओथंबलेल्या हृदयातून प्रार्थना उद्भवली पाहिजे. ]
“शबरीच्या मनात रामाव्यतिरिक्त अन्य
कोणताही विचार नव्हता .रामाचे दर्शन ,त्याचा चरण स्पर्श व त्याच्याशी संभाषण ह्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही इच्छा नव्हती. तिचे अंतःकरण रामरसाने,रामतत्त्वाच्या माधुर्याने भरुन गेले होते. ह्याशिवाय तिची कोणताही जप, ध्यान वा आध्यात्मिक साधना नव्हती. श्रीराम तिच्या पर्णकुटीस भेट देतील त्यासाठी तयारी करण्यात ती तिचा वेळ व्यतीत करत असे. घरासमोरील मार्ग स्वच्छ करताना , तिचे हृदय शुध्द करत असल्याचा भाव तिच्या मनात असे. तिच्या प्रयासामुळे दोन्ही मार्गातील खडे , काटेकुटे नाहीसे झाले.
ती अशी कामना करत असे की रामाने जर केस विंचरले नसतील तर झाडांवरून खाली लोंबाणाऱ्या वेलींमध्ये त्याचे केस अडकतील म्हणून वृक्षांखाली वाढलेल्या दाट झुडपांमधून चालत जाऊन ती वरुन खाली येणाऱ्या वेली तोडून टाकत असे. सीतेच्या कोमल पावलांना इजा होऊ नये म्हणून ती मातीची ढेकळे फोडत असे. राम कधी येतील हे कोणालाच माहित नसल्यामुळे , ती दररोज त्यांच्यासाठी जंगलातील झाडांची फळं व कंद गोळा करून आणत असे. ती कोणताही धोका पत्करु इच्छीत नसल्याने, रामाला उत्तमातली उत्तम फळे अर्पण करण्यासाठी प्रत्येक फळ कडु आहे, आंबट आहे का मधुर आहे हे ती चाखून पाहत असे. जंगलातून मार्गक्रमण करताना,राम लक्ष्मण सीता थकल्यावर बाजूला असलेल्या दगडांवर बसून विश्रांती घेतील ह्या विचाराने तिने तेथील सर्व दगड अत्यंत काळजीपूर्वक घासून त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत करुन ठेवला. अशा प्रकारे तिचे हृदय राम हृदय बनून गेले ! रामाची सेवा करण्याचा आनंद अर्जित करण्याची साधना शबरीने केली तशी तुम्ही गोरगरीबांमधील साईरामाची सेवा करू शकता. ह्या सेवेने तुम्हाला तुमच्यामधील आत्मरामाचा साक्षात्कार होईल. “