सार्वत्रिक मूल्यांवर निरनिराळ्या धर्मगुरुंच्या गोष्टी
सर्वधर्म समभाव हा विषय हाताळताना बालविकास गुरु मुलांना काही गोष्टी सांगू शकतात. उदा. “Life of young Sai” मधील घटना, “वैश्विक प्रेम”( महमद पैगंबराचे प्रेम आणि संयम, याचे वर्णन करणाऱ्या घटनांवरील गोष्टी), येशू ख्रिस्ताचे प्रेमाचे मूल्य आणि करुणा, याचे वर्णन करणाऱ्या बोधकथा, “The Good Samaritan” तसेच संयम आणि समाधानी या मूल्यांचे स्पष्टीकरण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या “Contentment and Peace” या बोधकथा . या गोष्टी आपल्या बालविकासच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. या गोष्टींच्या व्यतिरिक्त बालविकास गुरु इतर धर्माच्या अशाच गोष्टी निवडू शकतात. या गोष्टी मानवी मूल्यांचे एक चांगले उदाहरण असतील आणि त्याद्वारे एक मुद्दा अधिक स्पष्ट होईल की ही मुलभूत मानवी मूल्ये सर्व धर्मांच्या शिकवणुकींचा पक्का पाया आहे.
वर्गात घेता येतील असे उपक्रम
- सर्वधर्म भजन म्हणणे
- सर्वधर्म प्रार्थना (ओम् तत् सत्) म्हणणे.
- चित्रे जुळवणे; पूजा स्थान ओळखणे.
- मुलांना निरनिराळ्या धर्मांची पूजा स्थळे (उदा. मंदिर/चर्च’/मस्जिद इ.) यांची चित्रे दाखवावी
1. Identification of the places of worship
- मुलांना, ती कोणत्या धर्माशी संबंधित आहे हे ओळखायला सांगणे पवित्र धर्मग्रंथ ओळखणे.
- मुलांना वेगवेगळ्या धर्मांच्या पवित्र ग्रंथांची चित्रे दाखवणे (उदा. भगवद्गीता, बायबल ,क़ुराण इ.)
2. Identification of the sacred scriptures
- मुलांना ते ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे हे विचारणे.
- हाताच्या बोटांच्या गोष्टीवर छोटीशी नाटिका सादर करणे.
गुरुंसाठी नोंद
‘धर्म’ या विषयाच्या अधिक अभ्यासासाठी संदर्भ म्हणून गुरु ‘मुख्य धर्माची विस्तृत माहिती ‘ हा विषय वाचू शकतात.