हत्तीची बोधकथा
एकदा एक शक्तिमान सफेद हत्ती असतो. त्याची सोंड मजबूत असते, लांब दात असतात आणि माहूताकडून त्याला चांगले शिक्षण मिळालेले असते. त्याच्या माहूताबरोबर तो एका आंधळ्या लोकांच्या गावात येतो. गावात हत्ती आला आहे, अशी बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरते. त्याबरोबर गावातील हुशार माणसे आणि शिक्षक हत्तीचे परीक्षण करण्यास येतात.
हत्ती गेल्यावर ते एकत्र येऊन, प्राण्याविषयी चर्चा करतात. काहीजण म्हणतात की तो जाड, मोठ्या सापासारखा होता,त्यांनी हत्तीच्या सोंडेला हात लावला होता. काहीजण म्हणतात की तो मध्यम आकाराच्या सापासारखा होता, त्यांनी त्याची शेपटी चाचपडली होती. त्यानंतर अजून काहीजण म्हणतात की त्याचे शरीर मोठ्या खांबासारखे होते, इतर काही म्हणाले की तो मोठ्या पिंपासारखा अजस्त्र आणि वजनदार होता, अजून काही जणांच अस मत पडले की तो गुळगुळीत पण कठीण, तसेच उतरत्या रांगेत असावा. याचे कारण असे की काही अंधांनी त्याचा एक पाय धरला दुसऱ्याने त्याचे मुख्य शरीराला हात लावला आणि इतर काहींनी त्याच्या दाताला चाचपडले होते.
शेवटी त्यांचे मत इतरांना पटले नाही, म्हणून त्यांनी एकमेकांना रागावून दूषणे दिली. त्यांच्यामधील प्रत्येक अंध व्यक्तीने केलेले वर्णन अगदी प्रामाणिकपणे केले होते. प्रत्येकजण त्याच्या दृष्टिकोनातून अचूक होता हे माहूताला समजले होते, परंतु त्याचे वर्णन पूर्णतः सत्य मानण्यात ते चूक करित होते.
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या धर्माची लोक त्यांना समजते त्याप्रमाणे देवाचे वर्णन करतात. सत्य हे आहे की जरी प्रत्येकजण भिन्न मार्ग सांगतात , तथापि सर्व धर्म आपल्याला परमेश्वराप्रत
घेऊन जातात.
(“हत्तीची बोधकथा” ही बुध्दाच्या बोधकथा ‘द गोल्ड स्केल्स’ मधून Ed.Tormod Kennes Web 29 May 2020 http:// oaks.nvg.org.)
सर्व धर्म हे त्या एका सर्वधर्म समभाव आणि शिस्तीचे टप्पे अथवा पैलूच आहेत. हे त्या गोष्टीसारखे आहे, ज्यात सात अंध माणसे हत्तीचे परिक्षण करतात आणि इतरांना त्याचे वर्णन करतात. … या गोष्टीला गहन गर्भितार्थ आहे. आत्मा एक आहे, तथापि प्रत्येक जण त्याचा एक अंश पाहतो आणि वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचा बोध काढतो, परंतु, ही त्या प्रत्येक पैलूची एकात्म बेरीज आहे, जे सत्य स्थापित करते.”
[“सत्यसाई स्पिक्स” -खंड ९-, प्रकरण ४४]