परित्राणाय -पुढील वाचन
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय तदात्मानं सृजाम्यहम्
सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी युगयुगात अवतार घेतो.
सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश आणि धर्माची (सदाचरण तत्त्वाची ) संस्थापना करण्यासाठी परमेश्वर प्रत्येक युगात अवतार घेतो. उदा. प्रल्हादाचे रक्षण आणि हिरण्यकश्यपूचा नाश करण्यासाठी परमेश्वराने नरसिंह अवतार घेतला. द्वापार युगात कंस आणि कौरवांचा नाश करण्यासाठी त्याने भगवान कृष्णाचा अवतार घेतला. त्रेता युगात रावणाचा संहार करण्यासाठी त्याने प्रभु रामाचा अवतार घेतला.
आज कलियुगात, अखिल जगतास सुसंकृत बनवण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा घडण्यासाठी, साई अवतार घेऊन तो आज आपल्यामध्ये वावरत आहे. बाबा म्हणतात, “जर एखाद्या ठिकाणी किरकोळ स्थानिक दंगल झाली असेल तर ती मिटवण्यासाठी कॉन्स्टेबल पुरेसा आहे. जर दंगलीचे स्वरुप वाढत जाणार असेल तर सब-इन्सपेक्टर पाठवले जाते. दंगलीचे स्वरुप गंभीर असेल तर सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिसना स्वतः येऊन त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. परंतु जेव्हा मानवजातीची नैतिकता जर धोक्यात असेल तर इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस म्हणजेच परमेश्वर संतमहात्मे आणि साधकांच्या त्याच्या सैन्याला घेऊन खाली येतो.
परमेश्वर स्वतः का अवतरतो?
कोणी असही वीचारु शकतो, परमेश्वर स्वतः का खाली येतो? तो त्याच्या हुकुमतीत असणाऱ्या, यक्ष गंधर्व ह्यांच्यासारख्या उपदेवतांकडून वा देवदूतांकडून, धर्मस्थापनेचे कार्य का करून घेत नाही?
मुग़ल सम्राट अकबराने एकदा तोच (वरील) प्रश्न आपल्या दरबाऱ्यांसमोर मांडला. निराकार परमेश्वर, धर्माच्या रक्षणार्थ सगुणरुपात भूतलावर अवतरतो, हिंदुंच्या ह्या संकल्पनेचा त्यांनी उपहास केला.
बिरबलाने (अकबराच्या दरबारातील एक प्रख्यात दरबारी जो त्याच्या चातुर्याबद्दल व बुद्धिमत्तेबद्दल ओळखला जाई) ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एक आठवड्याचा अवधी मांगितला. काही दिवसानंतर, तो एकदा अकबर आणि त्याच्या कुटुंबाबरोबर नावेतून सैर करण्यास निघाला. बिरबलाने अकबराच्या धाकट्या मुलासारखा दिसणारा एक बाहुला सरोवरामध्ये फेकला आणि मोठ्याने ओरडला, “अरे, राजकुमार पाण्यामध्ये पडला!” ते ऐकल्यावर ताबडतोब अकबराने मुलाचे प्राण वाचवण्यासाठी, पाण्यात उडी घेतली.
बिरबलाने त्यानंतर उघड केले की पाण्यात फेकलेला केवळ एक बाहुला होता. आणि राजकुमार सुरक्षित असल्याचे त्याने सांगितले. अकबराचा क्रोध शमवण्यासाठी बिरबलाने पुढे त्याला स्पष्टीकरण दिले की धर्माचे रक्षण करण्याचे कार्य अन्य कोणावर न सोपवता परमेश्वर स्वतः मानवी रूप धारण करुन पृथ्वीतलावर येतो हे सत्य दर्शवण्यासाठी त्याला हे नाट्य घडवून आणावे लागले.
अकबर त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या नावेत असणाऱ्या अनेक राजसेवकांपैकी कोणालाही पाण्यात उडी घेण्याची आज्ञा देऊ शकला असता. परंतु मुलाविषयीचे अत्यंत प्रेम व तातडीने उपाययोजना करण्याची गरज हयामुळे त्याने मुलाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः पाण्यात उडी घेतली.
धर्माचा तीव्रतेने होणारा ह्रास ही एक दुखःद घटना आहे. परमेश्वराला सज्जनांविषयी वाटणाऱ्या आत्यंतिक प्रेमापोटी, त्यांच्या रक्षणार्थ तो स्वतः येतो.