- गजवदना गणनाथा नाथा
- गौरीवर तनया गुणालया
- विद्यादायक बुध्दिप्रदायक
- सिद्धिविनायक हे शुभ दायक
गजवदना गणनाथा नाथा
भजनाचे बोल
अर्थ
हे गजवदना, गणेशा, गणांच्या नायका, गौरीमातेच्या प्रिय पुत्रा, तू अत्यंत दयाळू आहेस. तू मांगल्य,विद्या आणि बुध्दी प्रदान करतोस.
स्पष्टीकरण
गजवदना गणनाथा नाथा | हे गजवदना, तू गणांचा नायक आहेस |
---|---|
गौरीवर तनया गुणालया | हे गौरीमातेच्या प्रिय पुत्रा, तू सद्गुणांचा शिरोमणी आहे |
गजवदना गणनाथा नाथा | हे गजवदना, तू गणांचा नायक आहेस |
विद्यादायक बुध्दिप्रदायक | हे प्रभु, तू विद्या आणि बुद्धी प्रदायक आहेस |
सिध्दी विनायक हे शुभ दायक | हे प्रभु, तू आम्हाला विवेक आणि मांगल्य प्रदान करतोस |
राग- सोहिनी (हिंदुस्तानी)/ हंसनंदी (कर्नाटिक)
श्रुती: सी # (पंचम)
ताल- कहरवा किंवा आदितालम् – ८ ताल
पाश्चात्य संकेतलिपी ( वेस्टर्न नोटेशन)
Indian Notation
Western Notation
https://archive.sssmediacentre.org/journals/vol_14/01JAN16/bhajan-tutor-Gajavadana-Gananatha-Natha.htm