- गणेश शरणम् परम पावनम् सत्यसाईनम् गजाननम्,
- नित्य स्मरणम् परम पावनम् सत्यसाईनम् गजाननम्,
- सद्गुरु चरणम् परम पावनम् सत्यसाईनम् गजाननम्,
- भवभय हरणम् परम पावनम् सत्यसाईनम् गजाननम्
गणेश शरणम् परम पावनम
भजनाचे बोल
अर्थ
आपण श्रीगणेशास विनम्र अभिवादन करु या, तसेच आपण विशुध्द भावनेने साईनामास वंदन करु या. पावन साईनामाचे अखंड स्मरण करताना, गजमुखी श्री गणेशाचे स्मरण करा. सद्गुरुंचे चरण परम पावन आहेत. तसेच साईं आणि गणेश ह्यांचे नामही परम पावन आहे. साईनाम आणि गजमुखी गणेशाचे स्मरण केल्याने जन्म मृत्यूचे भय नाहीसे होते.
स्पष्टीकरण
गणेश शरणम् परम पावनम् सत्यसाईनम् गजाननम् | गजमुख गणेशाचे रुप हे सत्यसाईंचे रुप मानले जाणाऱ्या भगवान सत्यसाईंना आम्ही शरण आलो आहोत. तुम्ही परम पावन आणि मंगल आहात. |
---|---|
नित्य स्मरणम् परम पावनम् सत्यसाईनम् गजाननम् | भगवान साई जे साक्षात श्री गणेश आहेत, त्यांचे प्रत्येक क्षणी आम्ही अखंडपणे परमपावन नाम स्मरण करतो. |
सद्गुरु चरणम् परम पावनम् सत्यसाईनम् गजाननम् | सद्गुरु भगवान् साई जे साक्षात श्री गणेश आहेत, त्यांच्या उध्दारक चरणांप्रती आम्ही विनम्र भावेने वंदन करतो |
भवभय हरणम् परम पावनम् सत्यसाईनम् गजाननम् | हे साई गणेशा, तू आमचे भौतिक अस्तित्वाचे भय नाहीसे करुन आम्हाला पवित्रता आणि मांगल्य प्रदान करतोस |
राग बहुतांशी सिंधु भैरवीवर आधारित
श्रुती – डी (पंचम)
ताल- कहरवा किंवा आदि तालम्- ८ ताल
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_12/01JAN14/bhajan-tutor-Prem-Ganesha-Sharanam.htm