प्रत्येक सत्कर्माला फळ असतेच
प्रत्येक सत्कर्माला फळ असतेच
कोणे एके काळी रोममध्ये अँड्रोक्लिस नावाचा गुलाम राहात होता. त्याला खरेदी करणारा त्याचा मालक भारी क्रूर होता. तो दिवसरात्र अँड्रोक्लिसला खूप काम करायला लावायचा आणि जराशी चूक झाली तर चाबकाने फोडून काढायचा, म्हणून एक दिवस तो मालकाच्या हवेलीतून पळून गेला व अरण्यात लपून बसला. तिथे त्याला निवाऱ्याला एक गुहा सापडली.
एके दिवशी पहाटे जवळ जवळ येणाऱ्या भीषण आवाजाने अँड्रोक्लिसला जाग आली. दुःखाने कण्हणाऱ्या सिंहाचे त गुरुगरणे होते. थोड्या वेळाने लंगडत लंगडत एक सिंह गुहेत आला. तो गुहेच्या एका कोपऱ्यात पसरला व आपला सुजलेला पाय चाटू लागला. सिंहाची दयनीय
अवस्था पाहून अँड्रोक्लिसचे हृदय द्रवले, तो धीटपणे सरपटत सिंहाजवळ गेला आणि त्याला झालेली इजा त्याने निरखून पहिले. दिसले की एक मोठा काटा पंजात खूप खोलवर घुसला आहे, त्याने ते काटा काळजीपूर्वक काढून टाकला व काही औषधी वनस्पतींनी त्या जखमेवर उपचार केले. तीन दिवसांनंतर जखम पूर्णतया भरली. कृतज्ञ सिंहाने प्रेमाने अँड्रोक्लिसचा हात चाटला व तो दूर गेला
अँड्रोक्लिस काही दिवस त्या गुहेत राहिला आणि मग जवळच्या एका शहरात गेला, दुर्दैवाने त्याच शहरात आलेल्या त्याच्या निर्दय मालकाने त्याला बाजारपेठेत पाहिले. त्याने ताबडतोब अॅड्रोक्लिसला अटक केली व तुरुंगात डांबले, त्या काळाच्या रोमन कायद्यानुसार धन्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुलामाला खूप कठोर शिक्षा होत असे. त्यांना एक छोटीशी कट्यार देऊन भुकेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात फेकीत असे. ही झटापट पाहायला राजा, त्याचे कुटुंबियांसह मोठी गदीं जमत असे. झटापटीच्या शेवटी नेहमी तो हिंस्त्र पशु गुलामाला मारीत असे व खा़ऊन टाकीत असे.
कायद्यानुसार अँड्रोक्लिस कट्यार हातात घेऊन मोठ्या पिंजऱ्यात उतरला. थोड्याच वेळात एका भुकेलेल्या सिंहाला त्या पिंजऱ्यात सोडण्यात आले. त्याने रागाने गर्जना केली आणि तो अँड्रोक्लिसकडे धावला. पण अँड्रोक्लिसने कट्यार उचलण्यापूर्वीच सिंह एकाएकी थबकला व त्याने आपली गर्जना बंद केली. हळूहळू व शांतपणे तो अँड्रोक्लिसपाशी आला व त्याने त्याचे हात पाय चाटायला सुरूवात केली. अँड्रोक्लिसनेही आपल्या अरण्यातल्या गुहेतील आपल्या मित्राला ओळखले व त्याच्या मानेभोवती हात टाकले.
हे दृश्य पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाला हा मोठाच चमत्कार वाटला म्हणून ते आनंदाने ओरडू लागले. राजा व त्याच्या कुटुंबियांनी अॅड्रोक्लिसला बोलावणे पाठवले. त्याने सिंहाला कसे जिंकले हे त्यांना ऐकायचे होते. त्याचा निष्ठुर मालक आणि त्याचे रानात पळून जाणे याबद्धल सर्व काही त्यांनी त्याच्याकडू ऐकले, “पण त्या गुहेत त्या जखमी सिंहाजवळ जाताना तुला भीती नाही वाटली?” राजाने विचारले, “अजिबात नाही,” अँड्रोक्लिस म्हणाला. “मला असं वाटला की जन्मभर दुष्ट मालकाचा गुलाम होऊन राहण्यापेक्षा एकदाच मारून जाऊन भुकेल्या सिंहली खाऊ घालणं अधिक बरं.” या उत्तराने राजाला कळवळा आला. त्याने ताबडतोब सर्व प्रेक्षकांसमोर उद्घोषित केले, “आज पासून अँड्रोक्लिस हा गुलाम नाही. मी आज्ञा करतो की त्याच्या निर्दय मालकाने त्याला सोडून द्यावे. अँड्रोक्लिस आजपासून स्वतंत्र आहे.”
अँड्रोक्लिसने सिंहाची छोटीशी सेवा केली होती. त्याच्या बदल्यात सिंहाने पिंजऱ्यात त्याला जिवंत सोडले इतकेच नव्हे तर त्याला गुलामगिरीच्या शृंखलेतून कायमचे मोकळे केले.
प्रश्न :
- गुहेभध्ये अड्ोक्लिस जेव्हा सिंहापाशी गेला तेव्हा सिंहाने त्याच्यावर हा का केला नाही?
- तुम्ही या गोष्टीतून काय बोध घ्याल?
- तुम्हाला कोणते प्राणी आवडतात? तुम्ही त्यांच्यावर प्रेम का करता? तुम्ही त्यांची कधी काही सेवा केली आहे काय?