Home

Print Friendly, PDF & Email
Title: सर्व एक आहेत, सर्वांबरोबर समानतेने वागा.
नेपथ्य- घरामधील दिवाणखाना
पात्रे- आजी, आई, वडील,हरी आणि रामू (नोकर)
संबंधित मूल्ये- सहानुभूती, स्वसहाय्य सोबत्यांविषयी आदरभाव.
दृश्य पहिले
(हरीच्या घरातील सकाळची गडबडीची वेळ. हरी शाळेत जाण्यासाठी तयार होत आहे. नोकर रामू घरातील सर्वांना मदत करतो.)
आई: (मोठ्या आवाजात) -रामू.... ! रामू... ! अरे कुठे आहेस तू? हरीला तयार होऊन शाळेत जायचे आहे तुला माहित नाही का?
रामू: आलो, आलो काकू. मी झाडांना पाणी घालत होतो. 
आई: त्याची काय  घाई आहे? तुला शाळेच्या बसचा हॉर्न ऐकू आला नाही?
हरी: आई, अग रामूने  माझे  बूटही पॉलिश करून  ठेवले  नाहीत.
आई: अलिकडे तो खूपच  आळशी झाला आहे. हरीच्या जेवणाच्या डब्याचं काय?
(रामू डबा आणण्यासाठी स्वयंपाकघरात धावतो)
वडील: (रागाने) एखाद्या खांबासारखा इथे का उभा आहेस? तू त्याची बॅग का नाही धरलीस? किती जड आहे ती.
रामू: ठीक  आहे. धरतो मी. हरी... दे  तुझी बॅग माझ्याकडे. (दोघेही बाहेर जातात.)
वडील: ओ..  आता मला आठवलं. त्याच्या काकांचा मला फोन आला होता... म्हणत होते की त्याच्या आईला बरं नाहीय आणि तिला रामूला भेटायचं आहे.
आजी: बिच्चारा! त्याला जाऊ दे. त्याच्या आईबरोबर ४/५ दिवस राहू दे.
वडील: बर. बर.
(रामूचे  काका येऊन त्याला  गावी  घेऊन जातात. तीन  दिवसानंतर---)
दृश्य दुसरे
आई: मी खूप थकल्ये. एवढं काम आहे. त्याची आपल्याला केवढी मदत होत होती.
हरी: तो माझी  शाळेची सगळी तयारी करून  ठेवायचा, त्याची कमी खूप जाणवतेय.
आजी: तुम्ही सर्वजण साध्या साध्या गोष्टींसाठीसुध्दा एवढे त्याच्यावर अवलंबून आहात.
वडील: खर आहे तू म्हणतेस ते. बागेची अवस्था पाहा कशी झालीय. त्याच्या अनुपस्थितीत झाडं अक्षरशः सुकून गेली आहेत.
आजी: पण तुमच्यापैकी कोणीही झाडांना पाणी घालू शकता. ती आपली बाग आहे ना. तिची देखभाल करणे आपली तितकीच जबाबदारी नाही का?
वडील: हरी... रामू तुझ्याच वयाचा आहे. हीच योग्य वेळ आहे. आता तुझी सगळी कामं रामूकडून न करुन घेता, कही कामं तू स्वतः स्वतंत्रपणे करायला हवीस. 
वडील: पुढे--- समज तुला वसतिगृहात (हॉस्टेल) जावे लागले तर तू कशी तुझी कामं करणार?
आजी: आणि समजा, तो आपल्याकडे पुन्हा आलाच नाही तर?
आई: अरे देवा, मी तर अशी कल्पनासुद्धा करू शकत नाही.
आजी: सगळी कामं त्याच्यावर ढकलून देण्यालाही काही मर्यादा आहे. 
वडील: आई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. 
आई: एकदा तो परत आला की आपण त्याच्यावरचा कामाचा भार कमी करू या. असच जर चालू राहिलं तर आपण कमालीचे आळशी बनून जाऊ.
हरी: आता मी सकाळी उठल्यावर मी माझे अंथरुण, पांघरुण घडी करुन ठेवेन. माझ्या बुटांना पॉलिश करेन, माझा डबा मी स्वतः भरेन, वॉटर बॅगेत पाणी भरुन घेईन.
वडील: वा! वा! खूपच छान. जर आपण त्याच काम वाटून घेतल तर त्यालाही थोडा मोकळा वेळ मिळेल. मी त्याला अभ्यासात मदत करेन. पुढच्यावर्षी आपण त्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करु या.
आजी: (आनंदाने) चांगली कल्पना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *