पंच महाभूते – ओळख
पंच महाभूते – ओळख
पावसानंतर आपल्याला आकाशात इंद्रधनुष्य दिसते. त्याचे सात रंग आहेत – जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी, तांबडा. तथापि सर्व रंग सफेद किरणांमधूनच आलेत. सफेद किरणांपासून आपणास तितका आनंद मिळणार नाही, जितका इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी मिळतो. तथापि, सफेद किरणांशिवाय इंद्रधनुष्याचे अस्तित्व अशक्य आहे. त्याचप्रमाणे, संपूर्ण निर्मितीचा आपण आनंद घेतो, परंतु त्या सृष्टीचा निर्माता, परमेश्वर, त्याच्यावर आपली दृष्टी जात नाही.
पावसाचे थेंब हे त्रिकोणाकृती लोलकाप्रमाणे असतात. ते सूर्याच्या सफेद किरणांना इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात परावर्तित करतात. त्याचप्रमाणे, आपले मन हे लोलकासारखे आहे. ते परमेश्वराचा दिव्य प्रकाश आणि पंचमहाभूतांच्या निर्मितीतून आलेल्या विश्वाच्या वैविध्यांचा आनंद मिळवून देते.
सर्वसाधारणतः या पंचमहाभूतांचे एकमेकांमध्ये योग्य संतुलन असते. आपले शरीरही या पंचमहाभूतांपासून बनले आहे. जर आपल्या शरीरातील पंचमहाभूतांचे आपण संतुलन राखू शकलो, तर आपले स्वास्थ्य चांगले राहते; आणि सृष्टीतील पंचमहाभूतांचेही संतुलन बिघडत नाही.
गोष्ट:
शेंगदाण्यांनी अर्धी भरलेली एक बाटली टेबलवर होती. एका लहान मुलाने ती पाहिली आणि मोठ्या आशेने जवळ गेला. त्याने बाटलीत हात घातला आणि मुठीत शेंगदाणे भरून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने,बाटलीचे तोंड लहान असल्याने शेंगदाणे भरलेली मूठ बाहेर येईना. तो रडू लागला. त्याचे वडील जवळच बसले होते. त्यांनी त्याला सर्व शेंगदाणे टाकून त्याच्या इवल्याश्या हातात येतील इतके थोडेसेच घेण्यास सांगितले. मुलगा थोडे शेंगदाणे घेऊन हात बाहेर काढतो आणि खुश होतो.
गाणे:
पंच महाभूते प्रभूची निर्मिती
आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी
आपणही आहोत त्याचेच घटक.
भूमाता जशी
तसे सर्व प्राणी
प्रश्न मंजुषा:
खाली घटक दिले आहेत. प्रत्येकासाठी ४ पर्याय दिले आहेत. त्यापैकी सर्वात योग्य निवडा –
- आकाश: विश्व, आकाश, नभ, ढग
- वायू: हवा, वारा, झुळुक, वादळ
- अग्नी: धूर, ज्वालामुखी, ज्वाला, शिलारस
- जल: पाऊस, पाणी, तलाव, टाकी.
- पृथ्वी: धरती, दगड, वाळू, सिमेंट
प्रार्थना:
‘हे जीवन आणि प्रकाशाचा निर्माता,
या सुंदर विश्वासाठी आम्ही तुझे आभारी आहोत.
गिर्यारोहणासाठी, खोल पाण्यात पोहण्यासाठी,
मातीच्या सुगंधासाठी, जो येई पावसाच्या थेंबांच्या स्पर्शाने
मधुर संगीतासाठी, ज्याने एका श्वासात आमची हृदये स्वर्गात जातात
आणि मित्राचा हात धरण्यासाठी.’
मौन बैठक:
डोळे बंद करा. निसर्गाच्या आनंदाची कल्पना करा. मृदु संगीत लावा.