परिचय–Overview

Print Friendly, PDF & Email
परिचय

Group Activities Overview Banner

बालविकास वर्गामध्ये वापरल्या जाणाऱ्या पाच मुख्य अध्यापन तंत्रापैकी सामूहिक कृती हे एक तंत्र आहे. काही व्यक्तींच्या समुहाने संघ म्हणून एकत्रितपणे केलेली एखादी क्रिया किंवा वैचारिक अथवा भावनिक पातळीवर केलेली कृती याला सामूहिक कृती असे म्हटलेले आहे. ग्रीक तत्त्वज्ञ प्लॅटोच्या शब्दात सांगायचे झाले तर “एक वर्षामधील संभाषणापेक्षा एका तासाच्या खेळातून कोणत्याही व्यक्तीबद्दल अधिक समजून घेता येते.” आमच्या बालविकास वर्गांमध्ये जोपर्यंत गुरु वर्गांमध्ये शिकवत असतो तो पर्यन्त आजूबाजूला कोण याची जाणीव ठेवता प्रत्येक मुलाची वर्गामध्ये वैयक्तिक उपस्थिती असते, परंतु एकदा का सामूहिक कृतिस सुरुवात झाली की मुलांच्या वर्तणुकीचा कल वेगळा दिसू लागतो। सम्पूर्ण वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य निर्माण होते.

एक अध्यापन तंत्र म्हणून सामूहिक कृतीचे वेगळेपण
  1. मोकळे वातावरण
  2. मुलांना त्यांचे विचार, कल्पना, मते मोकळेपणानी मांडण्यास वाव मिळतो.
  3. या उपक्रमामध्ये सर्व मुले सहभागी होऊ शकतात
  4. मुलांच्या आपापसातील क्रिया,प्रतिक्रिया यांना वाव असतो ज्यामुळे सर्वांगाने अध्यापन होते.
  5. शिकणे आणि अयोग्य गोष्टी विसरणे.
  6. मुलांचा नैतिक विकास आणि नैतिक निर्णय यांची पातळी जाणून घ्यायचे हे साधन आहे.
  7. मुलांचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतांना मानवी मुल्ये जीवनात अंतर्भूत होण्यास मदत होते.
  8. मानवी मुल्ये केवळ विचारात आणि कल्पनेत न राहता मुलांना ही मुल्ये आचरण्यात आणण्याची संधी या उपक्रमातून मिळते.
  9. याचे आयोजन वर्गामध्ये आणि वर्गाच्या बाहेर दोन्हीकडे करता येते.
  10. पर्यवरणाविषयी जागरुकता या संबंधात मुलांना संवेदनशील बनविण्याची संधी यामधून निर्माण होतात.
सामूहिक कृतींचे आयोजन करतांना गुरुंसाठी उपयुक्त माहिती:
  1. जी मुल्ये रुजवायची आहेत त्या दृष्टीने व्यवस्थित आयोजन करणे आणि योग्य अशा समूहिक कृतिची निवड करणे
  2. उपक्रम सुरु असतांना गुरुने केवळ निरीक्षण करावे,व उपक्रम व्यवस्थित व्हावा म्हणून मदत करावी. परंतु गुरुने मध्ये मध्ये बोलून टिका करू नये..
  3. गुरुने हे फावे की गटातील सर्व मुले उपक्रमात भाग घेत आहेत.
  4. सामुहिक कृती संपल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला याचे विश्लेषण
  5. चर्चेच्या माध्यमातून हळूहळू जे मूल्य तुम्हाला रुजवायचे ते मुले कसे स्वीकारतील हे पहावे.
बालविकास गट १ साठी असलेल्या काही सामूहिक कृती पुढे दिल्या आहेत –
  1. रोल प्ले -(नाटयीकरण)
  2. अभिवृत्त्ती चाचणी
  3. कोड़े
सामुहिक कृतीचे फायदे
  1. सामूहिक कृतीमुळे मुलांमध्ये एकतेची भावना निर्माण होते. मुलांमध्ये सांघिक भावना निर्माण होते.
  2. मुले एकमेकांचा आदर करतात आणि आपापसातील मतभेद, भांडणे सोडविण्यास शिकतात. दुसऱ्याने सांगण्या आधी त्याची गरज़ काय आहे या बाबतीत मुले संवेदनशील होतात.
  3. सामूहिक कृती मधून एकमेकांना मदत करणे, गोष्टी आपापसात वाटून घेणे, निकोप स्पर्धा ,एकमेकांना सहकार्य करणे अशी अनेक मुल्ये मुलांसमोर येतात.
  4. इतरांबरोबर झालेल्या परस्पर क्रिया, प्रतिक्रिया यामधून मुलांमध्ये आपले सामर्थ्य कोणते आणि कमकुवत बाजू कोणती याबाबत जागरुकता निर्माण होते.
  5. सामूहिक कृतीमुळे मुलांच्या विचारामध्ये आणि वृत्तिमध्ये स्वावलंबन आणि परिपक़्वता यांचा विकास होतो. त्यांचा आत्मविश्ववास वाढतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: