अंगुलिमाल

Print Friendly, PDF & Email

अंगुलिमाल

शरावती नदीच्या काठावरील अरण्यात अंगुलिमाल रहात होता. तो राजमार्गावर दरवडे घालून त्याच्या वस्तीजवळून जाणाऱ्या प्रवाशांना ठार मारायचा. त्याच्या भीतीने त्या बाजूने प्रवास करणे लोकांनी सोडूनच दिले होते.

हा दरवडेखोर केवळ लोकांची संपत्तीच लुटायचा असे नाही तर त्यांची करंगळी कापून त्यांची माळ करून गळ्यात घालायचा.

एकदा करंगळ्याची माळ करण्यासाठी जास्त करंगळ्या हव्या होत्या म्हणून तो वाटसरूची वाट पाहात बसला होता. लांबून एक भिक्षु येत असलेला त्याने पाहिला. तो ओरडला – “अरे भिक्षो! थांब, थांब.”

तो त्या भिक्षुच्याच्या मागे धावला. आश्चर्य म्हणजे तो त्याला गाठू शकला नाही म्हणून तो ओरडला – “अरे थांब! अजिबात हलू नकोस!” तो भिक्षु म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच होता. तो म्हणाला- “मी अजिबात हलत नाहीये! तू हलतो आहेस!” दरवडेखोराने विचारले -“याचा अर्थ काय?” बुद्धाने हळुवारपणे उत्तर दिले- “माझ्या बाळा, तुझ्या मनाला अजिबात शांती मिळत नाही! “अरे. हा तर मला “बाळा” म्हणून हाक मारत आहे.

त्याला खरोखरच तसे म्हणायचे आहे का? दरवडेखोर पुटपुटला. “मी कोण आहे हे तुला माहिती आहे का? मला तुझा उपदेश नको तुझी करंगळी हवी आहे.” दरवडेखोर गरजला. “इतकंच ना? माझ्या बाळा घे! बुद्ध आपले दोन्ही हात पुढे करीत म्हणाले.

“तुझ्या बोटांबरोबरच तुझा जीव पण घेईन!” अंगुलिमाल ओरडला. “जर त्यामुळे तुला मनाची शांति मिळणार असेल तर तू जरूर घे!” उत्तर दिले.

इतका शांत शांत आणि प्रेमळ मनुष्य अंगुलीमालाला आयुष्यात आजपर्यंत भेटला नव्हता. तो त्याच्या पाया पडला. अश्रुपूर्ण नेत्रांनी तो म्हणाला – “ प्रभो , यापुढे मी कोणालाहि मारणार नाही.”

बुद्धाने त्याला उचलले आणि आपल्या विहारात (मठात) नेले. त्याला ‘आणखी एक बंधु अंगुलि माल म्हणत अनाथ पिंडक नावाच्या भिक्षुकडे सोपवले.

दुसऱ्या दिवशी श्रावस्तीच्या राजाने विहाराला भेट दिली आणि बुद्धांना प्रणाम केला. त्याच्याकडे पाहून म्हणाले-“आपण एखाद्या मोहिमेवर निघालेला दिसत अहात!”

“होय स्वामी, अंगुलिमालाला पकडायला आणि त्याला ठार मारायला निघालो आहे. मी आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे.” राजाने उत्तर दिले.

“अरे राजन्, जर अंगुलिमालाने हिंसेचा मार्ग सोडून दिला आणि भिक्षूच्या जीवनास सुरूवात केली तर तुम्ही काय कराल?” बुद्धांनी विचारले.

“तर स्वामी त्याला प्रणाम करीन! पण अंगुलिमाल भिक्षु बनु शकेल अशी मला कल्पनासुद्धा करता नाही!” राजाने आश्चर्याने उत्तर दिले. “बाजूला बघ! झाडांना पाणी देत आहे.” बुद्ध म्हणाले. “ओह! प्रभो, माझ्या सर्व शक्तीनेही त्या दरवडेखोराला मी जिंकू शकलो नव्हतो. पण आपण मात्र आपले करांगुळीसुद्धा न उचलता त्याला जिंकलेत! अतिशय कनवाळू आणि प्रेमळअसे बुद्ध दीर्घायु होवोत!” असे म्हणून तो राजा बुद्धांच्या पाय पडला.

प्रश्न :
  1. दरोडेखोराला अंगुलीमाल हे नाव कसे पडले?
  2. तो बुद्धाला का पकडू शकला नाही?
  3. दरोडेखोरामध्ये परिवर्तन कसे घडले असावे?

[Source- Stories for Children-II Published by- Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *