प्रशंसा - Sri Sathya Sai Balvikas

प्रशंसा

Print Friendly, PDF & Email
प्रशंसा

माझ्यामधील आणि इतरांमधील चांगले गुण पाहणे.

(दोन पॅरेग्राफ आणि बिंदूंमध्ये विराम)

त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.

१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”

२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल. तुमच्या हृदयामध्ये प्रेमाचा उबदार भाव विकसित करा, त्यानंतर तुमच्याद्वारे तो सर्वत्र प्रसारित करा… तुम्ही सुंदर आणि प्रेमळ आहात आणि तसेच तुमच्या भोवतालचेही.

३) तुमचे प्रेम वर्गातील प्रत्येकापर्यंत प्रसारित होऊ दे… त्यानंतर ते तुमच्या कुटुंबापर्यंत…

… तुमच्या जवळ असणाऱ्या रस्त्यातील लोकांपर्यंत…

… त्यानंतर सर्वत्र शहरामध्ये…

… संपूर्ण देशामध्ये…

… संपूर्ण विश्वामध्ये…

… सर्व प्राणीमात्र, मासे, वृक्ष आणि वनस्पतींमध्ये…

” प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला प्रेमाची आणि प्रशंसेची आवश्यकता असते. तुमची प्रशंसा आणि प्रेम तुमच्या भोवती असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचे आहे.

४) आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या. हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.

‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: