लक्ष

Print Friendly, PDF & Email
लक्ष
आत्मजाणिवेचा सराव सुरू करताना

गुरुंनी कौशल्य विकसित करण्याची सराव पुस्तिका हळूहळू वाचावी, जेथे टिंब टिंब आहेत तेथे थोडा विराम घ्यावा ….

जर गुरुंची इच्छा असेल तर त्यांनी त्या पार्श्वभूमीवर एखादे अल्हाददायक संगीत लावावे.

त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.

१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”

२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.

३) अशी कल्पना करा की तुम्ही उन्हाळ्यामध्ये एका बागेत पायी फिरत आहात…

अशी कल्पना करा की तुम्ही पाहू शकत नाही परंतु तुम्ही ऐकू शकता आणि तुमची संवेदना उत्तम आहे…

तुमच्या पायाखाली असणाऱ्या मऊशार गवताची संवेदना अनुभवा…

तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळूकेच्या स्पर्शाची संवेदना अनुभवा…

सूर्यप्रकाशाच्या ऊबदारपणाची संवेदना अनुभवा…

वृक्षांच्या पानांची सळसळ ऐका…

तुमच्यामधील अंतरात्म्याची जाणीव ठेवा…

४)आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या. हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.

‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: