ॐ – वैश्विक ऊर्जा
ॐ – वैश्विक ऊर्जा
भगवान् म्हणतात,
“तुमच्या हदयात तसेच विश्वाच्या अंतरंगात दुमदुमणारा आध्य प्रणव ऐका.
ओम् हे अपरिवर्तनीय, शास्वत, वैश्विक आणि परमोच्च ईशाराचे प्रतीक आहे, ओम् हा आकाशातील तार्यांच्या गतीचा ध्वनी आहे.
निर्मितीच्या संकल्पाच्या उदयाने निराकारात (गुणातीत) चेतना जागृत झाल्यावर हा ध्वनी प्रकट झाला.
खरं म्हणजे समतोलातील लहानात लहान क्षुब्धतेतूनसुद्धा अतिशय सूक्ष्म ध्वनी निर्माण होतो. डोळ्यांची उघडझाप केल्यावर
जेव्हा डोळ्यांच्या पापण्या मिटतात, तेव्हाही अगदी पुसटसा का असेना, ध्वनी उत्पन्न होतो.
आपल्या कानांना ऐकू येत नाहीत, असे अगणित सूक्ष्म ध्वनी आहेत.
आपल्या कानांना ऐकू येत नाहीत, असे अगणित सूक्ष्म ध्वनी आहेत.
[http://media.radiosai.org/journals/Vol_07/01FEB09/quiz.htm]
“ओम् हा आद्य शब्द असून, दुसऱ्या सर्व शब्दांचा तोच प्राण आहे…
ओम् म्हणजे भगवंताचे एक नाम असून त्याला वैश्विक मान्यता आहे.
खिस्ती लोक त्यांच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये ‘आमेन’ म्हणतात, हे ओंकाराचेच वेगळे रूप आहे.
ओंकाराला वैश्विक संदर्भ व मान्यता आहे.
ओंकार स्थल, काल, धर्म आणि संस्कृतीच्या सर्व मर्यादा पार करते; आणि सर्व लोक याचे उच्चारण करू शकतात.”
[बृंदावनातील वासंतिक अमृतवर्षाव – १९७९ पृष्ठ १२४-१२५].
“ध्वनी ओंकारातूनच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेली संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. ओंकार सृष्टीच्या निर्मितीचा प्राण आहे. म्हणूनच त्याला प्रणव असेही म्हणतात. प्रणव म्हणजे सर्व जीवांमधील चैतन्य आहे किंवा जे जीवनाला व्यापून आहे.”
प्रणव मंत्राचे अत्युच्च महत्त्व आणि आशय विशद करताना भगवान् म्हणतात, ‘ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म’ एकाक्षर असलेला ओम् म्हणजे साक्षात् ब्रह्म आहे. ओकार मंत्र काय दर्शवतो आणि त्याचे विशेष महत्त्व काय? १ ऑक्टोबर १९८४ रोजी प्रशांति निलयम् येथील पूर्णचंद्र सभागृहात दिलेल्या दिव्य प्रवचनात भगवान बाबांनी याबद्दल विवरण केले आहे.
मंत्र म्हणजे केवळ शब्दांचा समुच्चय नाही. तर त्या शब्दांत गर्भितार्थ दडलेला आहे. मानवाच्या आंतरिक शक्तीतून तो प्रकट होतो. यात अंतर्भूत असलेल्या शक्तीमुळे या मंत्राचे (पवित्र शब्द) बरोबर उच्चारण केले असता मानवातील दिव्य शक्ती प्रकट होते.
या मंत्राच्या उच्चारणाने निमाण होणारी स्पंदन वैश्विक नादाशो (आदि ध्वनी) एकरूप हातात आणि वैश्विक जाणिवशी तादात्म्य पावतात. त्याच स्पंदनांनी वेदांचे रूप धारण केले आहे. (वेद म्हणजे आध्यात्मिक पवित्र ज्ञानाचे प्रकटीकरण)
[http://www.theprasanthireporter.org/2013/05/omkara/]
वैज्ञानिक जगानेसुद्धा या वैश्विक ऊर्जेचे अस्तित्व मान्य केले आहे:
१९७८ साली वैश्विक अतिसूक्ष्म किरणोत्सर्गाच्या शोधासाठी (CMB) अनों पेन्शिअस व रॉबर्ट विल्सन यांना पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. १९६४ च्या जूनमध्ये बेलायोग शाळेत प्रयोग करताना योगायोगानेच या शास्त्रज्ञांनाना ही घटना घडत असल्याचे दिसून आले. प्रथम त्यांना वाटले की, प्रयोगशाळेतील सदोष साहित्यामुळेच हे घडले आहे. मग सतत ऐकू येणाऱ्या या आवाजास ‘व्हाईट डायइलेक्ट्रिक मटेरियल’ म्हणजे पक्ष्यांची विष्ठा कारणीभूत आहे असेहा सुरुवातीला काही काळ त्यांनी म्हटले. (Fox, 2002 P.78), त्यांना अनुभवास येणारे विद्युतचुंबकीय उत्सर्जन हे त्यांनी आकाशातील ज्या बिंदूवर अँटेनाकेन्द्रित केली होती त्या बिंदूवर अवलंबून नव्हते आणि ते पुसटसा ‘हिस’ किंवा ‘हम्’ अशा स्वरूपाचे हाते. या अतिसूक्ष्म लहरी ज्यांचा संबंध तापमानाशी जोडता येईल त्या ७.३cm वेव्हलेंथला ३, ५k इतके उत्सर्जन (उष्णता) निर्माण करत होत्या (‘k’ केल्व्हिन हे युनिट दर्शविते, जी एक प्रमाणित वैज्ञानिक तापमान मापणी आहे; OK म्हणाजे अब्सोल्युट झीरो. जो एक तात्त्विक बिंदू आहे. ज्या तापमानाला सर्व हालचाली थांबतात:-४५९ फॅरनहाई किंवा -२७३ सेल्सियस) ही घटना का घडत आहे हे न समजल्यामुळे पेन्झिअम व विल्यम यांनी प्रिंस्टन विद्यापीठातील रॉबर्ट डिक यांची मदत मागितली डिक यांना त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर लगेच हा आवाज ‘बिग बैंग’ चा प्रतिध्वनी म्हणून ओळखला. या शोधाच्या आधी असे भविष्य वर्तविले होते की, जर बिग बँगचा सिद्धान्त सत्य असेल तर अवकाशात सतत एक प्रकारचे उत्सर्जन होत राहिले पाहिजे. परंतु, या भविष्यानुसार असे बन्चाच उच्च तापमानाला दिसून येईल असे होते
(Weinberg, १९७७, इ. 50; Hoyle, et al., 2000, p. 80). [Source: श्री सत्यसाई सेवा संघटना (यु.के.)/ साई ओरिएंटेड सेटर्स पॅक– Version १: March २००४]