ॐ – दिव्य संदेश
ॐ – भगवान श्री सत्यसाई बाबांचा दिव्य संदेश
- ॐ हे अविकारी, अविनाशी वैश्विक चैतन्याचे प्रतीक आहे… ॐ हा नभोमंडलातील ताऱ्यांच्या हालचालींचा धवना आहे. जेव्हा सृजनाच्या इच्छेचा उदय होता व ती निर्गुण निराकारास जागृत करून क्रियाशील बनवते तेव्हा हा ध्वनी निर्माण होतो. SSS6, Chap. 42
- प्रत्येक लहानसहान हालचाल वा घटना यांची परिणती ध्वनीमध्ये होते. तथापि तुम्हाला तो ऐकू येऊ शकत नाही कारण तुमच्या कर्णेद्रियांचा आवाका मर्यादित आहे. पापण्यांची उघडझाप करताना, पाकळ्यांवर दवबिंदू पडताना ध्वनी निर्माण होतो. शांततेचा भंग करणाऱ्या कोणत्याही आंदोलनाने ध्वनिची निर्मिती अनिवार्य आहे. स्वयंप्रेरित अशा मायेने ब्रह्माला जे आवरण घातले जाते त्या आध्य हालचालीमुळे जो ध्वनी निर्माण होतो तोच प्राणावाक्षर वा ॐ गायत्री हे त्याचे प्रगत रूप, त्यामुळे आध्यात्मिक जीवनाची दीक्षा ॐकाराच्या ध्यानातून मिळते म्हणून ही गोष्ट वंदनीय वा अमूल्य मानली जाते. SSS4, Chap. 18
- जर तुमची श्रवणोन्द्रिये प्रगल्भ असतील तर तुम्हाला प्रत्येक ध्वनीमध्ये, परमेश्वराचे अस्तित्व घोषित करणारा ॐ ऐकू येईल, पंचतत्वेही प्रणवनाद करतात. मंदिरातील घंटानाद, ॐ हे सर्वव्यापी परमेश्वराचे प्रतिक आहे हवाची जाणीव करून देतो. जेव्हा घंटानादातुन ॐ निर्माण होतो तेव्हा तुमच्यामधील देवत्व जागृत होऊन त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. मंदिरातील गर्भगृहासमोर वाजवल्या जाणाऱ्या घंटेचा तो गर्भितार्थ आहे SSS1, Chap. 9
- ॐकार आणि इतर ध्वनी व शब्द यांच्यामध्ये काय फरक आहे? ॐकाराचे उच्चारण करण्याच्या पद्धतीला व तो प्रतिनिधित्व करत असलेल्या उद्दिष्टाला एक विशिष्ठ, अद्वितीय गुणधर्म आहे. जेव्हा इतर शब्द उच्चारले जातात तेव्हा ओठ, जीभ, गाल व जबडा कृतीशील असतात. परंतु जेव्हा ॐ काराचे उच्चारण केले जाते तेव्हा यातील कोणत्याही अवयवाची हालचाल होत नाही. हे ॐकाराचे अद्वितीय वैशिष्टय आहे. म्हणून केवळ ॐ हेच अक्षर (अविनाशी) मानले जाऊ शकते. बाकी सर्व ध्वनी म्हणजे विविध भाषांची अभिव्यक्ती आहे.
- प्रणव हा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. ॐ या पवित्र अक्षरामध्ये वेदान्त, तत्त्वज्ञान आणि गूढवाद हयांची अनेक संक्षिप्त तत्वे आहेत. लहान मुले जेव्हा चालायला शिकतात तेव्हा त्यांना आधारासाठी तीन चाका पांगुळगाडा दिला जातो. आध्यात्मिक बालकांसाठी ॐ हा पांगुळगाड्यासारखे वाहन आहे. अ,ऊ आणि म ही त्याची तीन चाकं आहेत, ह्या मंत्राचे तीन घटक आहेत. ॐ हा आद्य ध्वनी आहे व तो मूलत: श्वासामध्ये अंतर्भूत आहे. SSS5, Chap. 46
- कृष्णाची मुरली म्हणजे ४ वेदांची अभिव्यक्ती व स्पष्टीकरण आहे. ॐ हे त्यांचे सार आहे.
- ‘अ, ऊ, म आणि अनुस्वार (हृदयाच्या गाभ्यात निनादणारा ध्वनी सूचित करतात.) हे चार वेदांचे प्रतिक आहेत.
- ॐ हे रामतत्त्वाचेही प्रतिक आहे. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे चार बंधू ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्या चार वेदांचे प्रतिनिधित्व करतात. SSS14, Chap. 9
- प्रणवाचा जप (ॐ काराचा जप व त्या गूढ़ अक्षरावर ध्यान) गर्जना करणाऱ्या लाटांना शांत करण्यास सहाय्य करतो, ॐ हे अक्षर वेदांमधील देवत्वाप्रती असणारे सर्व उपदेश व ईश्वरी उपासनेच्या सर्व पद्धती हयाचे एकत्रीकरण आहे; ॐ इति एकाक्षरं ब्रह्म ॐ हे एकाक्षर ब्रह्म आहे!
- रामकृष्ण परमहंसांनी एका व्यसनी मनुष्यास सांगितले की त्याने अफूचे दिलेल्या प्रमाणाहून अधिक सेवन करू नये, त्यांनी त्याला एक खडूचा तुकडा दिला व तो रोज वजन करून त्याच्या वजनाएवढी अफू घेण्यास सांगितले व त्यामध्ये कमी-जास्त करू नये असेही बजावले व त्यांनी त्याला एक अट घातली की दर वेळेस तो खडू वजन करण्यापूर्वी त्याने पाटीवर ॐ लिहावे. या अटीमुळे त्याला त्याच्या वाईट सवयीवर मात करण्यास सहाय्य झाले आणि तेही त्याच्या नकळत! त्याने त्यांची आज्ञा पाळली. प्रत्येक ॐ च्या लिखाणानंतर खडूचे वजन कमी होत गेले. असे करता करता तो खडू पूर्णपणे संपला व त्याचबरोबर त्याचे अफूचे व्यसनही सुटले! अफूमधून मिळणाऱ्या मनःशांतीच्या आसक्तीस परमेश्वरी नशेच्या चिरंतन आनंदाकडे वळण्यास ॐ सहाय्यकारी ठरला. SSS7, Chap. 43
- ॐ हा तीन स्वरांनी बनला आहे:
- अ नाभीपासून उत्पन्न होतो, ॐ घशातून जीभेपयंत येतो आणि म म्हणून मिटलेल्या ओठांनी त्याची सांगता होते.
- ॐ चे उच्चारण शक्य तेवढ्या धिम्या गतीने करावे आणि आवाजाची पातळी हळूहळू उंचावत न्यावी आणि म च्या उच्चारणानंतर हृदयाच्या पोकळीमध्ये शांततेची जाणीव होईपर्यंत हळूहळू खाली आणावी.
- श्वास दीर्घकाळ रोखून धरता येत नाही अशी सबब सांगून २ टप्प्यांमध्ये त्याचे उच्चारण करू नये.
- ॐ काराचा चढत जाणारा नाद व त्याचप्रमाणे खाली येणारा स्वर आणि त्यानंतर होणारी शांततेची जाणीव ह्यामुळे तुम्ही अंतरंगातून जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत चिकाटींने प्रयत्न चालू ठेवा.
- हे जागृती, स्वप्नावस्था, सुषुप्ती आणि या तिन्ही अवस्थांच्या पलीकडची चौथी अवस्था ह्यांचे प्रतिनिधित्व करते. तसेच साधकाचे व्यक्तीत्व पुष्प फलामध्ये विकसित होणे, त्याच्या अंतरातून पाझरणाऱ्या मधुर रसाने ते भरून जाणे आणि अखेरीस ते फळ वृक्षापासून अलगद गळून पडणे हे दर्शवते. SSS10, Chap. 13
- प्रशांती निलयममध्ये प्रभात समयी ॐचे २१ वेळा उच्चारण करण्याचा परिपाठ आहे.
- हा आकडा अहेतुकपणे निश्चित केला नसून, त्याचे काही विशेष महत्त्व आहे.
- आपल्याला पाच कर्मेन्द्रिये व पाच ज्ञानेन्द्रिये आहेत. तसेच पोषणसाठी पाच प्राण आहेत व पाच कोष आहेत जे दिव्यत्वाच्या स्फुल्लिंगाला म्हणजेच सत्याला आच्छादून टाकतात. हे सर्व मिळून वीस होतात.
- ॐ काराचे २१ वेळा उच्चारण हया वीस घटकांचे शुद्धीकरण करते आणि मनुष्यास एकवीसावे स्वतंत्र अस्तित्व बनवते व सत्यामध्ये विलीन होण्यास सिद्ध करते.
- जीवतत्व परतत्त्वामध्ये विलीन होते. SSS14, Chap. 3
- जीवतत्व २० घोड्यांच्या स्थावर स्वार झाले अशी आपण कल्पना करू शकतो.
- अखेरीस ३ वेळा “शांती” म्हणून प्रणवाच्या उच्चारणाची सांगता केली जाते व त्याचबरोबर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते.
- प्रथम उच्चारलेली शांती जीवाच्या अधिभौतिक (देह) शुद्धीकरणासाठी असते.
- दुसरी उच्चारलेली शांती जीवाच्या अधिदैविक (मन) शुद्धीकरणासाठी असते.
- तिसरी उच्चारलेली शांती जीवाच्या आध्यात्मिक (आत्मा) शुद्धीकरणसाठी असते.
- हे प्रणवाचे उच्चारण तुमच्यामध्ये जोम आणि उत्साह निर्माण करेल. तुमच्या मनातील क्षोभ शांत करेल आणि तुमच्यावर त्वरित वर्षाव करेल. SSS14, Chap. 3
इतर ऑडिओ/ व्हिडिओ संदर्भ:
डॉ. श्रीकांत सोला हे बंगलोरच्या श्री सत्यसाई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेसमध्ये हृदयविकार तञ्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेतील सत्यसाई संघटनेतर्फे रिजन १ मध्ये १२ ते १४ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या रिट्रिटमधील चौथ्या सत्रात त्यांचे भाषण झाले त्यामध्ये त्यांची ॐकाराच्या उच्चारणाची नेमकी पद्धत व त्यांची कारणे ह्यावरील साईउपदेश ह्याविषयी सांगितले. डॉ. सोलांचे भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://saicast.org/2012/20121012sola.html
[Source : SSS -7, Chap. 43]