बद्रीनाथ , केदारनाथ

Print Friendly, PDF & Email
बद्रीनाथ, केदारनाथ

भारतीयांना हिमालय अत्यंत पवित्र वाटतो. भगवद्गीतेत कृष्णाने म्हटले आहे की पर्वतांमध्ये मी हि मी हिमालय आहे. या पवित्र पर्वतश्रेणीमध्ये ३००० मीटरहून अधिक उंचीवर बद्रीनाथाचे प्रसिद्ध मंदीर आहे. त्याच्या एका बाजूला नारायण पर्वत आहे व दुसऱ्या बाजूने अलकनंदा वाहात आहे. इथे भगवान विष्णू बद्रीनारायण म्हणून माहीत आहे. येथील सुंदर मूर्ती ध्यानमग्न स्थितीत दिसते. तिच्या कपाळावर एक मोठा हिरा झळकतो आणि शरीर नाना तऱ्हेच्या सुवर्णालंकारांनी आच्छादित असते. ह्या देवालयाची दीर्घ काळ विस्मृती झाली होती. नं

नंतर शंकराचार्यांना ध्यानामध्ये त्याचा तपास लागला आणि त्यांनी या स्थानाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. हे देऊळ वर्षातून फक्त सहा महिने उघडे असते कारण पुढचे सहा महिने ते बर्फाने झाकलेले असते. या काळात मूळ मूर्तीची प्रतिनिधी म्हणून जोशीमठ येथे दुसऱ्या मूर्तीची पूजा करण्यात येते. पण हिवाळ्यानंतर जेव्हा मंदिर उघडते तेव्हा लोकांना एक चमत्कार दिसतो – देवळाची दारे बंद करण्यापूर्वी पुजाऱ्याने लावलेला दिवा सहा महिन्यांनंतरही तेवतच असतो.

केदारनाथाचे मंदिर हे शिवमंदिर आहे. केदारनाथकडे जाणारा रस्ता बर्फामुळे अडलेला आहे त्यामुळे उखीनाथ येथे प्रातिनिधिक देवतेचे पूजन केले जाते. असे म्हणतात की पांडव त्यांच्या अंतिम प्रवासात केदारनाथ येथे थांबले होते. द्रौपदीने आधीच प्राण सोडला होता व सहदेवही मरुन पडला होता. त्या सुंदर पर्वतामध्ये बसून पांडवांनी शिवाचे ध्यान केले होते . तेव्हापासून या पवित्र जागेत शिवाचे पूजा केली जाते.

[Source – Stories for Children – II]
[Published by – Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: