सतर्क रहा
सतर्क रहा
उद्दिष्ट:
ह्या खेळामध्ये चालू असलेला क्रम अचूकपणे लक्षात ठेवण्यासाठी मुलांकडून एकाग्रतेची व सतर्कतेची अपेक्षा आहे
संबंधित मुल्ये
- एकाग्रता
- स्मरणशक्ती
- सतर्कता
खेळ कसा खेळावा
- गुरुंनी मुलांना एका रांगेत बसवावे.
- गुरुंनी मुलांना खेळ कसा खेळावा हे समजावून सांगावे
पहिला मुलगा म्हणतो- १, दुसरा मुलगा म्हणतो- २, तिसरा मुलगा म्हणतो- ओम्, चौथा मुलगा म्हणतो- ४, पाचवा मुलगा म्हणतो- ५, सहावा मुलगा म्हणतो- ओम्, आणि पुढे असे सुरू राहते… - ३ रा, ६ वा, ९ वा, १२ वा ….. अशा पद्धतीने त्या मुलांनी पुढील आकड्या ऐवजी ओम म्हणायचे लक्षात ठेवले पाहिजे. असा हा खेळ सुरू राहिला पाहिजे.
- जो मुलगा त्याच्या वेळी सतर्क न राहता चुकीचे बोलेल त्याला बाद घोषित केले जाईल.
भिन्न प्रकार:
- २,४,६, जीझस १०,१२,१४ ,अल्ला १८,२०,२२, राम … असेच पुढे सुरू राहील.
- ५- प्रेम, १५ – सत्य, २५- शांती आणि असेच पुढे.