सतत जोडलेले रहा – (बी ऑनलाइन )

Print Friendly, PDF & Email
सतत जोडलेले रहा – (बी ऑनलाइन )
उद्देष:

सामाजिक कौशल्ये आणि समन्वय या गोष्टी प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक असून या उपक्रमातून त्यांचा विकास होण्यास मदत होते.

संबंधित मूल्ये:
  • प्रश्न सोडवणे
  • निर्णय घेणे
  • वेळेचे व्यवस्थापन
तयारी:
  1. वर्गात असणाऱ्या मुलांची संख्ये इतकी पत्रके गुरुंनी तयार करावीत
  2. प्रत्येक पत्रकावर रामायणातील एका व्यक्तीचे नाव लिहावे. (उदा. – जानकी, शबरी, कौसल्या, वाली, बिभीषण, वाल्मिकी, शत्रुघ्न, मंथरा, कैकयी, मंदोदरी इत्यादी)
How to Play
  1. पत्रके, पिसून त्यातील एक एक पत्रक एका एका मुलाच्या हातात गुरु देतील.
  2. वर्गातील मुलांचे दोन गट केले जातील व गुरु त्यांना खेळ कसा खेळायचा याबद्द्ल माहिती देतील.
  3. प्रत्येक गटातील मुलांनी आपल्या पत्रिकेवरील नावाप्रमाणे त्याच्या अद्याक्षराप्रमाणे ओळीने रांगेत पत्रक घेऊन उभे रहायचे.
  4. जो गट अद्याक्षराप्रमाणे ओळीत उभा राहील, तसेच कमीत कमी वेळात उभा राहील त्याला गुण मिळतील
    (उदा- उत्तर-न दशरथ, जानकी, कैकयी, कौसल्या, मंदोदरी, मंथरा , शबरी, शत्रुघ्न, वाली, वाल्मिकी, विभीषण)
बदल:

पत्रकांवर संतांची, थोर पुरुष आणि स्त्रियांची नावे लिहिता ये

गुरुंसाठी सूचना:

उपक्रमाची कठीणता-पातळी वाढविण्यासाठी एकाच अक्षराने सुरु होणारे अनेक शब्द वापरता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: