सौंदर्य
सौंदर्य
भूमिती द्वारे सौंदर्याचे महत्त्व समजण्यासाठी
गुरुंनी कौशल्य विकसित करण्याची सराव पुस्तिका हळूहळू वाचावी, जेथे टिंब टिंब आहेत तेथे थोडा विराम घ्यावा ….
जर गुरुंची इच्छा असेल तर त्यांनी त्या पार्श्वभूमीवर एखादे अल्हाददायक संगीत लावावे.
त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.
१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा.
एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”
२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.
३) कल्पना करा की तुम्ही आकाशामध्ये पक्ष्यासारखे मुक्त विहार करत आहात…
तुम्ही आकाशामध्ये, सुरक्षितपणे, आनंदाने, शांतीने आणि आत्मविश्वासाने तरंगत आहात…
जेव्हा तुम्ही आकाशात उडता, तेव्हा तुम्हाला तुमच्या खाली, पृथ्वीला वेढून टाकणाऱ्या तेजस्वी, उबदार प्रकाशाची जाणीव होऊ द्या… पृथ्वीवरील एक स्थान निवडा, तरंगत खाली या आणि त्या स्थानावर स्थिर व्हा.
कल्पना करा तुम्ही तुमच्या बरोबर सुरक्षा, सुखंसुविधा, आनंद, सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि मैत्री
या भेटी घेऊन आला आहात.
त्या सर्व भेटी तुमच्या भोवती, भिंती, खिडक्या, दारे, जमीन आणि छत या रूपांमध्ये साकार होताना पाहा… त्यांना, तुमचे आंतरिक चारित्र्य आणि गुण यांच्या बाह्य अभिव्यक्तीच्या रूपात पाहा.
कल्पना करा कोणत्या आकारातून हे गुण आणि मूल्ये उत्तम प्रकारे अभिव्यक्त होतात…
तम्ही बांधलेले घर सुरक्षित, धोक्यांपासून मुक्त असल्याचे आणि तुमच्या स्वतःच्या देह आणि आत्म्याच्या ज्या गरजा आहेत त्या समान गरजा व्यक्त करत असल्याचे पाहा.
तेही आता तुमच्याप्रमाणेच समान भेटी आणि आनंददायी स्वातंत्र्य घेऊन येत आहे…
सूर्य अस्ताला गेल्यावर तुमचे नविन घर उबेने आणि प्रकाशाने झळाळत आहे… तुम्ही तुमच्या नवीन घरामध्ये आनंदाने आणि समाधानाने विश्राम करा…
४) आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या.
हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.
‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)