भीष्म प्रतिज्ञा
भीष्म प्रतिज्ञा
ही गोष्ट पांडवांच्या व त्यांचे भाऊ कौरवांच्या काळात आपणाल घेऊन जाते. त्यावेळी आपला देश ‘महा भारत’ म्हणून ओळखल जात होता. (श्रेष्ठ भारत) कारण हा देश अनेक वीरांची माता होता आणि त्यांची कार्ये महात्म्यांची होती.
त्या काळी भीष्म दोघांचेही (कौरव-पांडव) प्रमुख होते. त्यांना सर्व पितामह म्हणत. त्यांच्यावर सर्वांचे सारखेच प्रेम होते व त्यांच्याबद्दत सर्वांना सारखाच आदर होता. ते राजा नव्हते तर त्याहून श्रेष्ठ होते. राजा बनवणारे होते. चेतवण्याऱ्या अनेक प्रसंगी ते श्रेष्ठ योद्धा म्हणून तेजाने तळपत असत. भीष्म राजा नव्हते परंतु राजा होण्यासाठी जन्माला आले होते , त्यांनीच स्वेच्छेने हा राजा होण्याचा अधिकार सोडला होता.
ते अशाप्रकारे घडले होते. भीष्म तरुण होते. एकटे पुत्र युवराज असल्याने वैभवात वाढले होते, अशावेळी एक विचित्र गोष्ट घडली. देशाचे सार्वभौम असलेले त्याचे वडील एका सुंदर मत्स्यकुमारीच्या प्रेमात पडले. हा कोळी चांगलाच अभिमानी होता. योग्य पातळी सोडून आपली मुलगी विवाह करत आहे त्याला आवडले नाही. तो म्हणाला जर मुलीने असे केले केले तर तिच्यावर अयोग्य असा मानहानीचा प्रसंग येईल. ती आपल्या उर्वरित आयुष्यात महालात राहील हे जरी खरे असले तरी त्या महालात तिचे स्थान काय असेल? तिच्याकडे कोणीही राणी म्हणून पाहणार नाही. तिच्या कोणत्याही मुलाला सिंहासनासाठी योग्य समजले जाणार नाही. जर भीष्माच्या ऐवजी तिच्या मुलाला राजसिंहासन मिळणार असेल तरच तो तिच्या लग्नाला परवानगी देईल. याचा अर्थ कोळी या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करु शकत नव्हता. त्या शूरवीर पुरुषांच्या काळात सर्व माणसे इतकी दृढ होती. अर्थात ही अट विचारार्ह नव्हती. ज्यावेळी शंतनूने ओळखले की मुलीचे वडील जसे तसेच वागणार तेव्हा त्याने आपली आपली मागणी मागे घेतली. परंतु त्या सुंदर मुलीला विसरणे शक्य नव्हते. प्रत्येकाच्या लक्षात आले की राजा दुःखी झाला आहे. राजपुत्राच्याही हे लक्षात आले. ज्यावेळी त्याला या गोष्टीचे कारण समजले त्यावेळी त्याने एक निर्णय घेतला.
खरोखरी याचा परिणाम अनपेक्षित होता. ज्या क्षणी भिसीमाला वडिलांच्या दुःखाचे कारण समजले त्या क्षणी त्याने आपला रथ बोलावला आणि तो कोळ्याच्या भेटीसाठी बाहेर पडला. तेथे पोहोचल्यावर त्याने अतिशय काळजीपूर्वक या विवाहाला नकार देण्याचे कारण विचारले. त्या कोळ्याने सांगितले की जर त्याची मुलगी भविष्यकाळातील राजांची आई होऊ शकली असली तर तिच्या विवाहाला त्याचा आक्षेप नव्हता.
त्यानंतर राजकुमार म्हणाला, ” हा प्रश्न अगदी सोपा आहे कारण मी तुमच्या मुलीच्या सत्यवतीच्या मुलांसाठी राजसिंहासन सोडायला तयार आहे.”
“अहो महराज, तुम्हाला असे वचन देणे सोपे आहे आणि तुमच्या सदिच्छेमुळे वचनाचे पालन करणेही सोपे आहे. परंतु काही काळानंतर तुमचा विवाह होईल आणि मग तुमच्या मुलांचे काय? ते काय तुमची अशी इच्छा होती म्हणून राजमुकुट टाकायला तयार होतील?” राजकुमाराने या शब्दातील सत्य ओळखले आणि शांतपणे निश्चय केला की वडिलांचे सुख त्याला साऱ्या जगापेक्षा अतिशय प्रिय आहे. त्याने दुसरी मोठी प्रतिज्ञा करण्याचा निश्चय केला.
तो म्हणाला, “मी तुम्हाला वचन देतो की मी विवाह करणार नाही त्यामुळे सिंहासनावर दावा करणारे मूल कधीही होणार नाही. आता मला तुमच्या मुलीला माझ्या वडिलांकडे घेऊन जाण्यास संमती देता का?”
त्या मत्स्यकन्येला बुरखा घातलेल्या स्थितीत नेण्यात आले. राजकुमाराने तिला आई समजून वंदन केले आणि स्वतःच्या रथात तिला बसवले.
त्यानंतर सारथ्याची जागा घेऊन त्याने लगाम सांभाळले आणि महालाच्या दरवाज्याकडे रथ हाकला.
शंतनूचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना, ज्या मुलासाठी त्याने आपली इच्छा शांतपणे सोडून दिली होती ती इच्छित वधू त्या मुलानेच त्याच्यासमोर आणून उभी केल्यावर शंतनूचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. पण ती कशी व का आली हे त्याला जेव्हा समजले तेव्हा त्याला मुलाच्या निःस्वार्थीपणाचे एकदम भय वाटले आणि त्याने प्रथमच त्याचे नाव “भीष्म” म्हणजे भयंकर असे ठेवले व त्याला विस्मयकारक आशीर्वाद दिला. राजा म्हणाला “जा मुला! हे समजून जा की जोपर्यंत तुला जगण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुझ्या जीविताला कोणीही कधीही धोका पोचवू शकणार नाही, तुझी प्रथम संमती घेतल्याखेरीज साक्षात मृत्यू देखील तुझ्याजवळ फिरकू शकणार नाही.
आईवडिलांच्या आशीर्वादांनी नेहमीच मुलाचे भाग्य बनते. पुष्कळ काळानंतर कुरुक्षेत्राच्या अंतिम वेळी मृत्युशय्येवर असताना भीष्माला वडिलांच्या शब्दांच्या सत्यतेची प्रचीती यायची होती. या वेळेनंतर राजकुमाराचे जीवन अर्ध्या योग्यासारखे बनले. त्याचे जीवन पूर्णपणे योद्ध्याच्या घटनांनी भरले होते. परंतु अन्य योध्याप्रमाणे त्याची कृती स्वतःच्या स्वार्थाची नव्हती. परंतु ती सदैव सामान्य प्रजेच्या सुरक्षिततेसाठी होती. राजांना राज्याभिषेक करणे, राजांचे व राज्याचे संरक्षण करणे हे त्याचे काम होते. सत्यवतीला दोन मुलगे होते. परंतु वैधव्याच्या सुरवातीच्या काळातच त्यातील एक मृत्यू पावला आणि असे वाटले की आता राजवंश खुंटणार.
पूर्वी सामान्य कोळ्याची कन्या परंतु आता राणी असणाऱ्या राजमातेने डोळ्यात अश्रु आणून भीष्माला लग्न करण्याची विनंती केली व त्याला वचनातून मुक्त केले आहे असे पुनः पुन्हा सांगितले. परंतु कोणतीही विनवणी त्याची प्रतिज्ञा मोडू शकली नाही. या उलट तो चिलखत धारण करणाऱ्या बैराग्याप्रमाणे शस्त्र घेऊन शेजारच्या राज्यातील राजकुमारींच्या स्वयंवरास गेला आणि अन्य सर्व पाहुण्यांना त्याने युद्धाचे आव्हान दिले. नंतर त्याने प्रत्येक द्वंद्वयुद्ध जिंकले आणि राजाच्या कन्यांना सत्यवतीच्या मुलासाठी वधू म्हणून घेऊन आला. अत्यंत अभिमानाने व कौतुकाने राजकन्यांनी त्या विचित्र योद्ध्याची शक्ती पाहिली. त्याची शक्ती खरोखरच भयंकर होती, प्रत्येकजण त्याच्यापुढे नतमस्तक होई आणि सूर्यप्रकाशात त्याचे सोने व रत्ना असणारे चिलखत चमके, भीष्म कुरुक्षेत्रात युद्धाच्या अंतापर्यंत जगले. कृष्णावर संपूर्ण कृष्णावर संपूर्ण विचार केंद्रित करून त्यांनी प्राण सोडला आणि अशा प्रकारे सनातन तत्वाशी ते एकरूप झाले. भीष्म-भयानक म्हणून भारतमातेने अतीव प्रेमाने त्यांचे स्मरण ठेवल्याने निरंतर जगले. ते अत्यंत शूरवीर व निष्कलंक असे तिचे सुपुत्र होते. ते जसे निर्भयपणे व निरपवाद जीवन जगले तसाच निर्भय व निरपवाद मृत्यू त्यांनी स्वीकारला.
Narration: Ms. Sai Sruthi S.V.
[Sri Sathya Sai Balvikas Alumna]