मुलगा आणि अस्वल
मुलगा आणि अस्वल
नदीच्या तीरावर काही मुले गुरे चरायला घेऊन आली होती. पावसाळ्याचे दिवस होते आणि अचानक नदीच्या पाण्याचा वेग वाढला. पाण्याचा लोंढा एकदम आल्याने एक अस्वल घसरून पाण्यात पडले आणि वाहत गेले. त्यातील एका मुलाने तरंगणारा गठ्ठा पाहिला. दुरून त्याला तो ब्लॅंकेटचा गठ्ठा वाटला. तो त्याच्या मित्रांना म्हणाला, “मी पाण्यात उडी मारून तो गठ्ठा बाहेर काढतो” असे म्हणून त्याने पाण्यात उडी मारली.
चुकून ब्लॅंकेटचा गठ्ठा समजल्याने मुलाने त्या अस्वलास घट्ट मिठी मारली. अस्वलानेही त्याच्या हातांनी त्याला मिठी मारली. जितका तो मुलगा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करी, तितके अस्वल त्याला सोडत नव्हते. त्याची पकड अधिकच घट्ट होत होती. किनाऱ्यावरून मुले ओरडली, “मित्रा, तो गठ्ठा सोडून निघून ये.” पाण्यातला मुलगा सुटण्याची धडपड करीत ओरडला, “मी जितका सुटण्याचा प्रयत्न करतो ते मला सोडतच नाही.”
प्रश्न:
- मुलाने नदीत काय पाहिले?
- त्याने काय केले?
- त्याच्या मित्रांनी त्याला काय सल्ला दिला?
- मुलाचे काय झाले?