चित्तचोर

Print Friendly, PDF & Email

Compilation of Divine Discourses

कृष्णाचे आकर्षण

आपल्या दैवी लीला, चमत्कार- शक्ती, प्रेम यांनी तो प्रत्येक हृदयाला आकर्षित करतो – आणि विषय-वासनांपासून आपले मन दूर करतो. बाबा म्हणतात आकर्षणाची ही कृती हे दिव्यत्वाचे वैशिष्ठ्य आहे आणि ते पुढे म्हणतात की दिव्यत्व आपल्याला फसविण्यासाठी किंवा चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी आकर्षित करत नाही तर ते आपल्यामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी,सुधारणा करण्यासाठी, आपल्या मनाची पुनर्रचना करण्यासाठी आपल्याला आकर्षित करते.

मशागतीचा भाव

कृष्ण हा शब्द कृष ‘म्हणजे पिक घेण्यासाठी जमिनीची मशागत करणे या धातुपासूनही आला आहे. म्हणून कृष्ण या शब्दाचा अर्थ-‘ जो भक्तांच्या हृदयातील नकारात्मक वृत्तींचे तण काढून श्रद्धा धैर्य आणि आनंद या सारख्या सकारात्मक वृत्तींचे बीज पेरतो कृष्ण भक्तांच्या हृदयात आनंदाचे पीक घेतो. आणि तो सच्चिदानंद असल्याची जाणीव भक्ताला करून देतो

नवनीत चोरम

भगवान म्हणतात,”कृष्णाचे वर्णन नवनीत चोर (ज्याने लोणी चोरले) म्हणून केले जाते. कृष्णाने चोरलेले लोणी कोणते ? तर ते म्हणजे भक्ताचे ह्रदय. भक्त कृष्णाला आपले हृदय अर्पण करतो आणि कृष्ण त्याचा स्वीकार करतो. याला चोरी कसे म्हणता येईल ? जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नकळत त्याची वस्तु घेते तेव्हा त्या व्यक्तीला चोर म्हणता येईल. परंतु कृष्ण तुमच्याकडे प्रेमाची मागणी करतो आणि तुम्ही ते दिल्यावर त्याचा स्वीकार करतो. प्रेमाच्या परिपूर्णतेतून भक्तांनी कृष्णाला चोर म्हटले आहे. त्यामधून तिरस्काराचा अर्थ व्यक्त होत नाही. भक्तीच्या आणि आकलनाच्या पातळीनुसार भक्त देवाचे वर्णन विविध प्रकारे करतात. स्वानुभवाची ही अभिव्यक्ती आहे. दिव्यत्त्व हे सर्व मर्यादांच्या आणि गुणांच्या पलीकडचे आहे.

“स्वामी चित्तचोर आहेत”

बरेचदा स्वामी श्री सत्य साई उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देत असत. प्रत्येक मुलाने केलेल्या ‘ मॉडेल’ जवळ ते थांबत असत आणि ते मॉडेल कशाचे आहे ते मुलांना स्पष्ट करून सांगण्यास सांगत असत. १९९४, १९९५ आणि १९९६ मध्ये भरविलेल्या प्रत्येक प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली होती. या प्रत्येक प्रदर्शनामध्ये त्यांनी अनेक तास व्यतीत केले होते. या पैकी एका प्रदर्शनातच ‘ छोटीशी सूचना देणारा गॅजेट ‘ हे जे मॉडेल होते त्याची प्रसिध्ध लीला गाडली होती. जो मुलगा या मॉडेलचे प्रात्यक्षिक स्वामींना दाखवत होता त्याने स्वामींनी त्यांचा हात मॉडेलच्या पलीकडच्या भाजूला ठेवावा अशी विनंती केली, आणि असे केल्यावर भजर वाजेल (अलार्म वाजेल) असे तो म्हणाला. स्वामींनी तसे केले परंतु अलार्म बेल वाजलीच नाही! स्वामींनी मग त्या मुलाला तेथे त्याचा हात ठेवण्यास सांगितले आणि मुलाने तसे केल्यावर ‘अलार्म बेल’ वाजली! आणि ही गूढ गोष्ट दोनदा घडली! मग स्वामींनी अतिशय सुंदर शब्दात सांगितले, “मी चोर नाही! मी चित्तचोर आहे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *