ख्रिश्चन
May17
ख्रिश्चन धर्माची प्रमुख शिकवण
- तुमच्या शत्रूवरही प्रेम करा.
- जे तुम्हाला दुःख देतात, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. जे तुमच्याशी गैरव्यवहार करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
- जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली, तर दुसरा गालही पुढे करा.
- द्या आणि त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा ठेवू नका.
- तुमच्या स्वर्गातील पित्याप्रमाणे दयाळू आणि क्षमाशील व्हा.
- जे इतरांकडून तुमच्यासाठी केले जाऊ नये असे तुम्हाला वाटते ते तुम्ही कधीही इतरांसाठी करू नका.
- इतरांविषयी मत बनवू नका. प्रथम स्वतःच्या चुका सुधारा.
- इतरांचा निवाडा करू नका आणि परमेश्वर तुमचा निवाडा करणार नाही.
- इतरांना क्षमा करा आणि परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल.
- जे इतरांनी तुम्हाला करू नये असे वाटते ते तुम्ही इतरांना करू नका.
- जसे मी तुमच्यावर प्रेम करतो, तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करा.
- एकमेकांना क्षमा करा.
- वाट चुकलेल्या मुलाचे पित्याच्या घरी नेहमीच स्वागत आहे.
- परमेश्वर प्रेम आहे, परमेश्वरावरील प्रेमासहित ईश्वराभिमुख व्हा. म्हणजे परमेश्वर तुमच्यामध्ये
- आणि तुमच्या जीवनामध्ये विध्यमान असेल.
- स्वर्ग तुमच्या आतमध्येच आहे. प्रथम स्वर्गाचा शोध घ्या म्हणजे बाकीचे सर्व तुम्हाला आपोआपच प्राप्त होईल.
Christianity – Prayer