करुणा आणि नि:स्वार्थता

Print Friendly, PDF & Email
करुणा आणि नि:स्वार्थता
मानवी वृत्तीची महानता समजून घेणे

गुरुंनी कौशल्य विकसित करण्याची सराव पुस्तिका हळूहळू वाचावी, जेथे टिंब टिंब आहेत तेथे थोडा विराम घ्यावा ….

जर गुरुंची इच्छा असेल तर त्यांनी त्या पार्श्वभूमीवर एखादे अल्हाददायक संगीत लावावे.

त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.

१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”

२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.

3) डोळे बंद करा आणि मनामध्ये असलेले वाईट विचार आणि मनाला अस्वस्थ करणारे विचार उच्छवासा बरोबर बाहेर टाका…

तुम्हाला नि:स्वार्थ बनवण्यासाठी तुमच्या अंतरंगात प्रेम आणि करुणा आहे हे जाणून घ्या… कठीण परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे मनोधैर्य आणि शक्ती आहे हे जाणून घ्या.

तुम्ही मूर्तिमंत प्रेम आहात…

तुम्ही तुमच्या भोवती असणाऱ्या लोकांना, चांगुलपणा आणि प्रेम देण्याचा संकल्प करू शकता…

विचार करा की तुम्हाला हेच करायला आवडेल का…

४) आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या.

हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.

‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *