हरिण जे प्रिय बनले

Print Friendly, PDF & Email
हरिण जे प्रिय बनले

बाबांकडे, कुत्री, ससे, मोर, छोटे हिरवे पोपट आणि हरिणे ह्यासारखे अनेक पाळीव पशुपक्षी मोठ्या पिंजऱ्यांमध्ये ठेवलेले होते. त्यांची हत्तीण साई गीताचे तिच्या स्वामींवर अत्यंत प्रेम होते. बाबा जर दीर्घ काळासाठी तिच्यापासून दूर गेले असतील तर ती अश्रू ढाळत असे. अन्य कोणत्याही भक्ताहून बाबांना हार घालण्याचा विशेष अधिकाराची संधी साई गीतालाच मिळाल्याचा दावा ती करू शकते.

स्वामींनी एक छोटे हरिणाचे पिल्लू पाळले होते. आणि ते एक देखणे काळवीट बनले होते. कडक उन्हाळ्यातील तो एक दिवस होता.स्वामी भोजन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीमध्ये विश्राम करत होते. साधारणतः ते संध्याकाळी दर्शनाच्या वेळेसच पुन्हा खाली उतरतात.

परंतु त्या दिवशी स्वामी भोजन करून लगेचच खाली उतरले व घाई घाईने हरिणांच्या उद्यानाकडे गेले. ते थेट त्या काळवीटाजवळ गेले. ते त्यांची प्रतिक्षाच करत होते. त्यांनी त्याच्या अंगावरून हात फिरवला व त्याला फळे खाऊ घातली. स्वामींच्या दिव्य हातातून फळे खाल्ल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याने स्वामींच्या चरणी लोळण घेतली व ते पंचत्व पावले. असे आहे परमेश्वराच्या प्रेमाचे व कृपेचे सौंदर्य.

[Source: Lessons from the Divine Life of Young Sai, Sri Sathya Sai Balvikas Group I, Sri Sathya Sai Education in Human Values Trust, Compiled by: Smt. Roshan Fanibunda]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *