निर्धार

Print Friendly, PDF & Email
निर्धार
निर्धार शक्तीला जाणणे

गुरुंनी कौशल्य विकसित करण्याची सराव पुस्तिका हळूहळू वाचावी, जेथे टिंब टिंब आहेत तेथे थोडा विराम घ्यावा ….

जर गुरुंची इच्छा असेल तर त्यांनी त्या पार्श्वभूमीवर एखादे अल्हाददायक संगीत लावावे.

त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.

१) “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”

२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.

३) त्या वेळेचा तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही एखादे गोष्ट कठीण असूनही केलीत … आणि तेव्हा तुम्हाला कसे वाटले?

त्या वेळेचा तुम्ही विचार करा जेव्हा एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छा होती परंतु तुम्ही त्यामध्ये तुम्हाला यश आले नाही…

तेव्हा तुम्हाला कसे वाटले?

अशी कल्पना करा की ती गोष्ट तुम्ही पुन्हा करण्याचा प्रयत्न करत आहात… आणि पुन्हा अपयश… आणि पुन्हा प्रयत्न… पुन्हा प्रयत्न करूनही प्रत्येक वेळेस अपयश… कल्पना करा

तुम्हाला त्यामध्ये यश मिळाले…

तुमच्या यश संपादनाप्रित्यर्थ होणाऱ्या गौरवाची कल्पना करा…

तुम्हाला ते कसे वाटते?

निर्धार आणि प्रयत्न करत राहणे यासाठी स्वतःला शाबासकी द्या… जर तुम्ही प्रयत्न करत राहिला तर अखेरीस तुम्हाला यश प्राप्त होईल हे जाणून घ्या.

४)आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या.

हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.

‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: