भक्ती

Print Friendly, PDF & Email
भक्ती

प्रेम विविध स्वरुपांमध्ये अभिव्यक्त होते आणि प्रेमाची अनुभूती विविध स्वरुपांमध्ये येते.

  1. मित्रांच्या प्रती प्रेम- मैत्री
  2. आईचे तुमच्या प्रती असलेले प्रेम- स्नेह
  3. गरीब आणि गरजुंच्या प्रती प्रेम- सहानुभूती
  4. मोठ्यांच्या प्रती प्रेम- आदर
  5. देशाप्रती प्रेम- देशभक्ती
  6. परमेश्वराप्रती प्रेम- भक्ती
दिव्यत्वाप्रती प्रेम म्हणजे भक्ती

आपण सर्व जण आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो, बरोबर आहे. आपल्या आईप्रती, आपल्या देहमातेप्रती असलेले प्रेम आपण कशाप्रकारे व्यक्त करतो? तिला आनंद मिळेल अशा गोष्टी करून! ईश्वर ही लोकमाता आहे जिने आपल्याला पंचमहाभूते,पंचज्ञानेंद्रिये, पाच मूल्ये, आणि पंचसाधने आपल्या सुखासाठी दिली आहेत. तर मग आपण परमेश्वराप्रती आपले प्रेम कसे व्यक्त केले पाहिजे?

प्रार्थनेमधून- ईश्वराची भक्ती करुन आणि त्याच्या गुणांची स्तुती करुन आपण ईश्वराशी संवाद साधतो. परमेश्वराचे दिव्य नाम घेतल्याने आंतरिक शांती, आंतरिक समतोल साधण्यास मदत होते. कोणतेही कार्य सुरु करण्याआधी आपण धर्माचे मूर्तिमंत रुप असलेल्या परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे.

प्रार्थना कशी केली पाहिजे?

भक्ती ही खरी आणि सखोल असली पाहिजे. आपली भक्ती खरी आणि गहिरी असेल तर परमेश्वर आपल्या रक्षणासाठी धावून येतो. भक्तीमुळे विशुध्द प्रेम, गहन श्रध्दा,सदाचरण, उदात्त विचार आणि दृढनिष्ठा यांना चालना मिळते. “श्रद्धेने आणि प्रेमाने घेतलेल्या नामामध्ये साधकाला परमेश्वराची कृपा प्राप्त करुन देण्याची शक्ती असते.”

नवविधा भक्तीची दृष्टांतासहित उदाहरणे देण्यासाठी गुरुंनी मुलांना प्रल्हाद, द्रौपदी, गजेंद्र, नारद, हनुमान, शबरीची भक्ती या आणि इतर काही गोष्टी सांगाव्या.

  1. धन्यवाद देऊन:- परमेश्वराच्या चरणी आपण प्रेम आणि कृतज्ञता ही पुष्पे अर्पण केली पाहिजेत.
  2. कार्यास आरंभ करताना जर आपण परमेश्वराचे स्मरण करतो आणि त्याची प्रार्थना करतो तर कार्य पूर्ण झाल्यानंतरही आपण परमेश्वराचे स्मरण करुन त्याला धन्यवाद दिले पाहिजेत नाही का?
  3. आई -वडिलांचा आदर करुन:-“मातृदेवो भव, पितृदेवो भव” हे तेत्तिरीय उपनिषदातील वचन आहे. आपण आपल्या आई-वडिलांना मान दिला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे कारण या पृथ्वीवर ते परमेश्वराची मूर्तीमंत रुपे आहेत.
  4. जे काही करु त्या प्रती दृढनिष्ठा ठेवून:- कर्म हीच पूजा. जर आपण आपले कर्म किंवा कर्तव्य हृदयपूर्वक, संपूर्ण आस्थेने रस घेऊन केले तर ती एक प्रकारची भक्तीच झाली. कर्तव्य हाच परमेश्वर, कार्य ही पूजा.
    सुचविलेले वर्ग उपक्रम

    • अभिवृत्ती चाचणी /पुढील प्रश्नांवर चर्चा.
      • ज्यांचा तुम्ही पृथ्वीवरील परमेश्वर म्हणून आदर करता त्यांची नावे लिहा. (मातृदेवो भव, पितृदेवो भव —– याचे आकलन)
    • असा एखादा प्रसंग सांगा जेव्हा तुम्ही मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि तुमच्या प्रार्थनेला परमेश्वराने कसा प्रतिसाद दिला? (श्रद्धा व शरणागती)
    • जर परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकली तर तुम्ही कशाप्रकारे परमेश्वरास धन्यवाद द्याल? (परमेश्वराची भक्ती आणि उत्सव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: