दशरथाचा मृत्यु

Print Friendly, PDF & Email
दशरथाचा मृत्यु

Dasaratha's Demise

दरम्यान, सुमंत अयोध्येला पोहोचले. रामांनी दिलेला संदेश त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवला. लोकांनी आणि मंत्र्यांनी महाराजांना आनंदात ठेवावे आणि रामाने भरतास विनंती केली की त्याने एकात्मता राखावी ,प्रजेचे हित सांभाळावे आणि मातापित्याची सेवा करावी. दशरथाचे दुःख अधिक तीव्र झाले. रामाचे नाव घेत घेतच त्याने अखेरचा श्वास घेतला.

गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत
दशरथाचे त्याच्या पुत्रावर असीम प्रेम होते. त्याच्या प्रिय रामाला १४ वर्षे वनवासात पाठवण्याचा विचारही असहनीय झाला आणि त्या दुःखातच त्याने अखेरचा श्वास घेतला. पालकांचे त्यांच्या मुलांप्रती असलेले प्रेम निःस्वार्थ आणि निरपेक्ष असते. मुलांच्या कल्याणापुढे , त्यांचे स्वतःचे जीवनही त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसते .

अंतर्भूत मूल्ये: सदैव पालकांच्या प्रेमाचा आदर करा व त्यांच्याप्रती कृतज्ञता बाळगा.

भरत आणि शत्रुघ्न आजोळच्या घरुन अयोध्येला परतले आणि त्यांना ती हृदयद्रावक वार्ता समजली. जेव्हा भरताला समजले की त्याच्या मातेच्या इच्छेनुसार रामाला वनवासात पाठवण्यात आले व त्याला राज्याभिषेक करण्याची योजना बनवण्यात आली तेव्हा त्याची मान शरमेने खाली झुकली. वसिष्ठांनी त्याला त्याच्या पित्याचे अंतिम संस्कार करण्यास सांगितले. रामाला अयोध्येस परत घेऊन येण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठी तो आणि त्याच्याबरोबर शत्रुघ्न ,राण्या ,वसिष्ठ आणि इतर काही जण वनात गेले.

He was asked by Vasishta to perform the last rites of his father. He wanted to bring back Rama to Ayodhya, so he went to the forest. He was accompanied by Shatrughna, the Queens, Vasishta and many people from Ayodhya.

गुरुंनी मुलांना तात्पर्य सांगून अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत

मंथरेच्या कुटील कारस्थानास बळी पडून कैकयीने स्वतःचे जीवन उद्ध्वस्थ केले. तिने तिच्या पतीस गमावले. तिच्या ह्या भयानक वागणूकीमुळे पोटच्या पुत्राने तिची कडक शब्दात हेटाळणी केली . तिच्या भोवती असणाऱ्या लोकांचे प्रेम आणि आदर तिने गमावला.

अंतर्भूत मूल्ये- जीवनाचे ABC (Avoid Bad Company & Always Be Careful) – कुसंगती टाळा आणि सदैव सावधानता बाळगा. इतरांचा तुमच्या मनावर प्रभाव पडू देऊ नका. कृती

करण्याआगोदर त्याच्या परिणामांचा विचार करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *