डिंग डाँग बेल
डिंग डाँग बेल
उद्देश्य
‘धीम्या गतीने पण दृढ निश्चयाने चालणारा शर्यत जिंकतो’ यावर जोर देत आपल्यावर सोपविलेली कामगिरी एकाग्रतेने आणि दृढ निश्चयाने करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
संबंधित मूल्ये
- शांतपणा
- एकाग्रता
- दृढनिश्चय
साहित्य
पूजेमधील छोटी घंटा.
खेळ कसा खेळावा
- गुरूने वर्गाची विभागणी दोन गटांमध्ये करावी.
- एका गटातील मुलाकडे घंटा द्यावी.
- त्या मुलाने हातात घंटा धरून घंटेचा आवाज होऊ न देता खोलीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालावे, घंटेचा आवाज झाल्यास ते मूल बाद होईल.
- नंतर दुसऱ्या गटातील मुलाची पाळी.
- अशा प्रकारे खेळ खेळावा, ज्या गटामध्ये ही कामगिरी पार पाडणाऱ्या मुलांची संख्या जास्त तो गट जिंकला असे घोषित करावे!!