खेळ (शिस्त)
शिस्तीवरील खेळ
नियम अथवा नियम रहित खेळ:
गुरुंनी विद्यार्थ्यांना कॅरम बोर्ड अथवा बुध्दीबळ किंवा कोणताही इतर बोर्ड वापरण्याचा खेळ खेळावयास सांगणे-तत्पूर्वी एकच अट असावी, ती म्हणजे खेळासाठी कुठलेही नियम पाळू नयेत.
सुरुवातीस मुलांना ही कल्पना आकर्षक वाटेल, तथापि खेळ सुरु केल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की नियमाविना खेळण्यात काही मजा नाही; काही वेळानंतर त्यांना खेळ कंटाळवाणा वाटेल कारण नियम असल्याने कोणीही कसेही खेळू शकतात. आता गुरुंनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, की नियम हे कसे आपल्या हितासाठी बनवले जातात. तसेच नियम आणि अधिनियमांशिवाय कोणत्याही उपक्रमात, आणि जिवनामधेही खरे आव्हान नाही.
प्रश्न बरोबर-उत्तर चूक-खेळ
गुरुंनी वर्गासाठी प्रश्नावली तयार करावी. गुरुंनी मुलांना सूचना द्याव्या की तिच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर फक्त “साईराम” असावे. दूसरा प्रश्न विचारला की, मुलांनी पहिल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि तिसरा प्रश्न विचारल्यावर, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. उत्तरे विचित्र वाटतील आणि मुले खेळाचा आनंद घेतील.
काही प्रश्न आणि उत्तरे नमुन्यादाखल दिले आहेत:
१. | तुम्ही तुमचे दात कधी घासता? | साईराम |
२. | तुम्ही टि. व्ही. किती वाजता बघता? | सकाळी |
३. | तुम्ही कराग्रे-कधी म्हणता? | संध्याकाळी शाळेतून आल्यावर |
४. | ब्रह्मार्पणम कधी म्हणता? | सकाळी झोपेतून उटल्यावर दिवस सुरु होण्यापूर्वी |
५. | तुमचे कपाट साफ करण्यासाठी वेळ देता का-देत असाल तर कधी? | रोज जेवणापूर्वी |
६. | नगरसंकिर्तनला जाता का आणि कधी? | प्रत्येक रविवारी, दुपारी ३ ते ४ मध्ये |
उत्तरे विचित्र करतात नं?
शिकवण
मुलांना उत्तरे का विचित्र वाटली, तसेच जर ते त्यांच्या दैनंदिन जीवनात अशा रितीने वागले तर काय होईल! जीवनात जर शिस्त नसेल, तर आपणही हास्याचा विषय होऊ. ह्यावर गुरुंनी सविस्तर चर्चा करावी. या विश्लेषणातून एक महत्त्वाचा मुद्दा गुरु मुलांपर्यंत पोहोचवतील की शिस्तीविना जीवन हे दोऱ्याविना पतंगासरखे आहे.