शिस्त

Print Friendly, PDF & Email
शिस्त

Discipline1

शिस्त म्हणजे नियमपालनासाठी लोकांचे प्रशिक्षण किंवा आचारसंहिता. नियम, कायदे यांच्या विरोधात आपण क्षुब्ध होता कामा नये. आपल्या फायद्यासाठीच ते बनविलेले असतात. शिस्तीविना किर्ती प्राप्त होत नाही. सद्गुण व चारित्र्य यांचे संवर्धन होण्यासाठी शिस्तीची आवश्यकता आहे. वाईट सवयी घालवून चांगल्या सवयी रुजविण्यास शिस्तीची मदत होते.

चारित्र्य संवर्धनासाठी भगवान श्री सत्यसाईबाबांनी काही तंत्रे स्पष्ट करून सांगितली आहेत.

विचारांमधून कृती निर्माण होतात
कृतींमधून सवयी निर्माण होतात.
सवयी माणसाचे चारित्र्य घडवितात.
चारित्र्य आपले भाग्य ठरविते.चारित्र्याविना जीवन हे दिवा नसलेल्या मंदिरासारखे अमंगल होय.

(सत्य साई स्पीक्स व्हॅाल्यूम 34 पान क्र. 227)

आपण निसर्गाकडून शिस्त शिकली पाहिजे:

Discipline2

निसर्गातील सर्व गोष्टी त्यांच्या आचरणांच्या नियमांचे पालन करतात. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आणि सजीव गोष्टी या सर्वांसाठी काही नियम आहेत. (गुरुंनी मुलांना ग्रहमाला, सूर्योदय, रस्त्यावरील शिस्तबध्द ट्रॅफिक, अशी चित्रे दाखवून जर शिस्त नसेल तर काय होईल याबद्दल चर्चा करावी.)

“तुमच्यामध्ये भक्ती असेल, तुम्ही नेमून दिलेली तुमची कर्तव्ये पार पाडत असाल, परंतु जर तुमच्यामध्ये कडक शिस्त नसेल तर या दोन्हीचा उपयोग नाही. जीवनातील प्रत्येक कृती शिस्तीद्वारा नियंत्रित व नियमबध्द झाली पाहिजे.” -भगवान बाबा

शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी भगवान बाबांनी पुढील आज्ञा मनुष्याला दिल्या आहेत.

  • १. दिव्य वचनांचे पालन करा:
    वाईट पाहू नका, चांगले पाहा, वाईट ऐकू नका, चांगले ऐका, वाईट बोलू नका, चांगले बोला, वाईट विचार करू नका, चांगले विचार करा, वाईट कृती नका, चांगली कृती करू करा
  • २. इच्छांवर नियंत्रण ठेवा:
    वेळ वाया घालवू नका, शक्ती वाया घालवू नका, पैसा वाया घालवू नका, अन्न वाया घालवू नका
  • ३. वाणीचे शुध्दीकरण ही आध्यात्मिक शिस्तीमधील पहिली पायरी आहे. क्रोध येऊ देऊ नका आणि मधुर वाणीने बोला. तुमची विद्वत्ता, तुम्ही प्राप्त केलेल्या गोष्टी या बद्दल फुशारक्या मारु नका. विनम्र असा. सेवेसाठी तत्पर असा. वाणीचा अपव्यय करू नका. शांत बसण्याची सवय लावून घ्या. यामुळे निरर्थक विचार मांडणे यापासून तुमचा बचाव होईल.

    (सत्य साई स्पीक्स, व्हॅाल्यूम II, प्रकरण 6)

  • रोज एक तास मौन पाळण्याचा सराव तुम्ही केला पाहिजे. यामुळे तुमच्यामधील वैश्विक उर्जेचा व्यय कमी होईल आणि आणि निश्चितपणे मनःशांती लाभेल. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही शिस्त सुध्दा अंगी बाणली पाहिजे.

    (सत्य साई स्पीक्स, व्हॅाल्यूम 30, प्रकरण 17)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: