डंब शेराज
डंब शेराज
उद्दीष्ट
हा एक साधा पण उत्तम खेळ असून त्यांत मुलांना आपल्या जागेवरून उठून त्यांच्यातील नाट्य, अभिनय कौशल्य सादर करावे लागते. त्यांतील शब्द ज्या दैवताचा, संताचा किंवा इतरांचा नाम-निर्देश करतो, त्याबद्दल मुलांनी चेहऱ्यावरील हावभाव आणि अभिव्यक्ती यांची एक मालिकाच (शब्दांचा उच्चार न करता) सादर करावयाची आहे. त्यामुळे वर्गातील इतर मुलांना तो शब्द ठळकपणे समजेल आणि सहज ओळखता येईल. तसेच इतरांबरोबर संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्यांच्या भावना आणि शारीरिक हालचाली कशा ओळखायच्या, वाचायच्या आणि त्याचा अर्थ कसा लावायचा यासाठी या खेळाची मुलांना मदत होईल. तसेच आपल्या ओळखीच्या व्यक्तिमत्त्वांचे स्वभाव,गुण आणि त्यांची वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी मुलांच्या कल्पनाशक्तीत सुधारणा घडेल.
संबंधित मूल्ये
- निरीक्षण
- सावधपणा/दक्षता
- सहनशीलता/ चिकाटी
- सांघिक कृती -सहकार्य
- स्नेहभाव
आवश्यक साहित्य
कागद, पेन, शब्दांची यादी, छोट्या चिठ्ठ्या बनवणे- त्यावर वरील यादितील एक शब्द असेल.
पूर्वतयारी
यादीत खालील नांवे लिहिता येतील
- देवतांची नांवे- चंद्रशेखर, नीलकंठ, गंगाधर, गिरिधर, श्रीराम, हनुमान, एकदंत, लंबोदर, नटराज, कृष्ण, पार्थसारथी, मुरलीधर, मुरुगन, काली, विष्णु, सरस्वती, विट्ठल, नरसिंह, जिझस, बुध्द.
- संत/ऋषी – अव्वैयार, मीराबाई, विवेकानंद, चैतन्य महाप्रभु, नारद
- व्यक्तीमत्त्व – अर्जुन, गांधीजी, बोस, बाल गंगाधर टिळक, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज, कवि भारती, मदर टेरेसा
- उत्सव/सण – होळी, दीपावली, नवरात्री, नाताळ, रक्षाबंधन, ईद, स्वातंत्र्यदिन
- पंचमहाभूते- पृथ्वी, तेज, आप,वायु, आकाश
खेळ कसा खेळायचा
- गुरु वर्गातील मुलांची दोन गटात विभागणी करतील.
- अ गटातील एका मुलाला वर्गात पुढे उभे रहायला सांगण्यात येईल.
- गुरु त्याला एक चिठ्ठी देतील आणि कोणत्याही एका सूचक शब्दाचा उच्चार न करता, त्या मुलाला चिठ्ठीतील शब्दानुसार अभिनय करायला सांगतील.
- गट अ मधील अभिनयातून जे सांगयचा प्रयत्न करत आहे, ते दुसऱ्या गटाने ओळखायचे आहे. दुसऱ्या गटातील एक एक मुलगा/मुलगी क्रमाने शब्द ओळ खायचा प्रयत्न करतात.
- गट ब मधील जे मूल बरोबर शब्द ओळखेल, त्याला यानंतर गुरुंनी सुचवलेल्या शब्दानुसार अभिनय करण्याची संधी मिळेल.
- या पद्धतीने अतिशय मजेत आणि उत्कंठेत खेळ पुढे चालू राहील.