अभिवृत्ती चाचणी (कर्त्तव्य)
अभिवृत्ती चाचणी (कर्त्तव्य)
प्रश्न १)तुमचा गृहपाठ करताना, तुम्ही तो
- स्वतःचा स्वतः करता.
- पालकांच्या सूचनांनुसार करता.
- पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही.
- आईने किंवा बहिणीने करावा अशी अपेक्षा करता.
प्रश्न २)तुमच्याकडे कुंड्यांमध्ये लावलेली झाडे/घरी छोटीशी बाग आहे. तुमच्या आईला तातडीने काही दिवसांसाठी बाहेरगावी जायला लागत आहे. आई नसताना, तुम्ही
- झाडांना पाणी घालाल.
- वडिलांना पाणी घालायला सांगाल.
- झाडांना कोणी पाणी घालतयं का नाही याकडे लक्ष देणार नाही.
- घरी झाडांच्या कुंड्या आहेत हे तुम्हाला माहितच नाही.
प्रश्न ३)तुमच्या मोठ्या भावाच्या हातून चुकून पंखे चालू राहिले आहेत. हे लक्षात आल्यावर तुम्ही
- ताबडतोब पंखे बंद कराल.
- आईकडे भावाबद्दल तक्रार कराल.
- सर्वप्रथम पंखे बंद कराल आणि नंतर आईकडे तक्रार कराल.
- पंखे चालू आहेत याकडे दुर्लक्ष करून तुम्ही मित्र-मैत्रिणींबरोबर खेळण्यासाठी बाहेर जाल.