कर्त्तव्य

Print Friendly, PDF & Email
कर्त्तव्य


 

धर्मानुसार केल्या जाणाऱ्या कर्मांना ‘कर्तव्य’ असं म्हटलं जातं. नुसते ‘कर्त्तव्य’ म्हणजे व्यक्तीला नेमून दिलेले काम असे म्हणता येईल. अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे कर्त्तव्य आहे. डॉक्टरचे कर्त्तव्य म्हणजे त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांवर चांगले उपचार करणे तर तिकिटांचे वाटप करणे हे रेल्वेमधील आरक्षण कारकुनाचे कर्तव्य आहे.

मुले म्हणून आपली प्रमुख कर्तव्ये कोणती?
  1. पालकांच्याप्रती कर्तव्य:- आपल्या आई- वडिलांची प्रेमाने, आदराने, आज्ञाधारकपणे आणि कृतज्ञतापूर्वक काळजी घेणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे.
  2. Duty to elders- Rendering loving service to them and taking care of parents and grandparents are our obligatory duties.
  3. शिक्षक आणि गुरु यांच्याप्रती कर्तव्य:- आपण आपले शिक्षक जे आपल्याला ज्ञान प्रदान करतात आणि आपले गुरु जे आपल्याला आपल्यामधील सुप्त मानवी मूल्ये प्रकट करण्यास मदत करतात यांचा आदर केला पाहिजे.
  4. समाजाप्रती कर्तव्य:- आपण समाजामधून शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक कौशल्ये प्राप्त करतो. ही कौशल्ये प्राप्त केल्यानंतर आपण समाज कल्याणासाठी योगदान दिले पाहिजे. समाजामधील सहकाऱ्यांविना आपण आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही.
  5. स्वामी म्हणतात कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे “सर्वांवर प्रेम करा, सर्वांना मदत करा” “सदैव मदत करा, कोणालाही दुखवू नका” हे वचन खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरले पाहिजे. समाजातील इतर लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजे जबाबदारी! आपली कृती, आपले आचरण, आपले बोलणे, हालचाली यामधून कोणालाही इजा होता कामा नये. कोणाच्याही कार्यात अडथळा उत्पन्न होता कामा नये. जर आपण रस्त्यावरून एक मोठी काठी हलवत जात असू तर आपल्यामागे कोणी असू शकेल हे भान आपल्याला असले पाहिजे.
  6. पृथ्वीमातेप्रती कर्तव्य:- आपण आपले अन्न, वस्त्र आणि निवारा नैसर्गिक साधनांपासून प्राप्त करून घेतो. म्हणून आपण नैसर्गिक साधनांचे जतन केलेच पाहिजे आणि निसर्गाशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे. वातावरण प्रदूषित करून आपण पृथ्वीमातेचा अपमान करता कामा नये.
  7. मातृभूमी प्रती कर्तव्य:- आपण आपल्या मातृभूमीवर प्रेम केले पाहिजे आणि ज्या दुष्ट शक्ती तिच्या सार्वभौमत्वास धक्का पोहोचवत असतील अशा शक्तींना रोखले पाहिजे. एक आदर्श नागरिक या नात्याने आपण आपली कर्तव्ये बजावली पाहिजेत.
  8. दिव्य पालकांच्या प्रती कर्तव्य:- आपण परमेश्वराची लेकरे आहोत. म्हणून आपण आपल्या आचारणाने परमेश्वराला आनंद दिला पाहिजे. विचार, शब्द आणि कृती यामध्ये ऐक्य राखण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

भगवान बाबा म्हणतात आपण आपल्या जीवनात या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे आणि ही कर्तव्ये आपण अन्तःकरणपूर्वक पार पाडली पाहिजेत आणि ईश्वराला अर्पण केली पाहिजेत. असे केले तरच आपली कर्तव्ये म्हणजे पूजन होईल.

गुरुंनी मुलांना वर्गामध्ये स्वामींचे बालपण, ईश्वरम्माला दिलेल्या वचनांचे त्यांनी कसे पालन केले, दूरवर जाऊन ते कुटुंबासाठी पाणी आणत असत असे स्वामींच्या जीवनातील प्रसंग सांगावेत. म्हणजे बालपणापासून सर्व क्षेत्रात आपली कर्तव्ये पार पाडण्यात स्वामी एक आदर्श होते, हे मुलांना समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: