दारका

Print Friendly, PDF & Email

दारका

द्वारका भारतातील चार पवित्र स्थानांपैकी एक आहे. कृष्णाने राजा म्हणून या नगरीवर राज्य केले. या नगरीचे स्थान स्वतः कृष्णाने निवडले होते आणि विश्वकर्म्याने भारतीय युद्धानंतर थोड्याच वर्षांत हे नगर वसविले. गांधारीचा शाप सफल झाला. यादवांनी परस्परांचा घात केला.

द्वापरयुगाचा अंत झाला. कृष्णावताराचे कार्य संपले. एकदा स्वर्ग असलेला तो प्रदेश ओसाड पडला. कालांतराने समुद्राने या नगरीचा नाश केला. पण आजही यात्रेकरू तिथे जातात व ते स्थान पवित्र व आदरणीय मानतात.

सध्याचे मंदिर गोमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. त्यात कृष्णाची एक मूर्ती आहे.

मीरेने तिच्या आयुष्याचे शेवटचे दिवस याच ठिकाण घालवले, शेवटी ती देवळात गेली व भगवंताशी एकरूप झाली.

Source – Stories for Children – II

Published by – Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *