हवा – १
हवा – १
ओळख:
परमेश्वराने हवा हे एक अतिशय महत्वाचे घटक निर्माण केले आहे. सजीव प्राणी क्षणभरही हवेशिवाय जगू शकत नाही. आपल्या पूर्वजांनी हवेची ‘वायुदेव’ म्हणून पूजा केली.
गुणधर्म:
ध्वनी आणि स्पर्श हे हवेचे दोन गुणधर्म आहेत. एका जागी अडकून न राहणे हा याचा गुण आहे. ती सर्वदूर फिरते, परंतु एका जागी अडकून राहत नाही. तिला कोणताही गंध नाही. हवा नि:स्वार्थपणे सर्वांसाठी खुली असते, श्रीमंत, गरीब, उच्च, नीच, मानव अथवा पशु, पक्षी, वनस्पती इत्यादी. तिचे प्रेम सर्वांसाठी समान आहे. हवेशिवाय मधुर संगीत अशक्य आहे.
गोष्ट:
एक थोर राजा होऊन गेला. तो नेहेमी त्याच्या प्रजेसाठी चांगले उपक्रम राबवित असे. एकदा त्याने दवंडी पिटवली की कोणाचीही एखादी वस्तू बाजारात विकली गेली नाही तर राजा ती विकत घेईल. एकदा एका माणसाने शनिदेवाची मूर्ती बाजारात विकण्यास आणली. परंतु शनिदेवाची मूर्ती विकत घेऊन घरात कोण बरे ठेवणार?त्यामुळे राजाने, शब्द दिल्याप्रमाणे ती मूर्ती विकत घेऊन राजवाड्यात ठेवली. रात्री राजाच्या स्वप्नात लक्ष्मी देवी आली आणि म्हणाली की शनी इथे असल्याने ती इथून बाहेर जात आहे. राजा म्हणाला की ती जाऊ शकते, त्याने त्याच्या शब्दाची सत्यता राखण्यासाठी हे केले. काही वेळाने प्रभू धर्म राज त्याच्या समोर आले आणि म्हणाले की शनिदेवांमुळे तेही सोडून जात आहेत. राजाने तेच उत्तर पुन्हा दिले. त्यानंतर सत्य देव आले. त्यांना पण जायचे होते, परंतु राजा त्यांना पकडून म्हणाला, “मी तुम्हाला जाऊ देणार नाही. केवळ तुमच्यामुळेच मी लक्ष्मी आणि धर्माला जाऊ दिले.” त्यामुळे सत्य देवांना तिथे राहावे लागले. ते गेले नाहीत. हे पाहून, लक्ष्मी आणि धर्म सुद्धा परत आले.
मूल्य गीत:
१ जसा वायु शीतल निर्मळ
तसा हास्यात फुलुदे माझ्या आनंद निखळ
चरणकमल त्यांचे राहतील सदा माझ्या जवळ
२ प्राणशक्ती मी तुझी
जीवनदायी
श्वास मी तुझा
रणरणत्या उन्हात वाहत
देतो मी तुज झुळुका शीतल
३ फुलाचा वृक्षांचा सुगंध
अन पक्ष्याचे मधुर संगीत
सळसळत्या गवतातूनी वाहत निर्मितो मी नवसंगीत
स्तब्ध बैठक:
मुलांना सुंदर सुगंधी फुले असतील अशा बागेत घेऊन जा. त्यांना तिथे शांत बसण्यास सांगा. डोळे बंद करून त्यांना कल्पना करू द्या: “मी एका सुंदर बागेत बसले आहे. थंडगार हवा वाहत आहे. हवेमध्ये फुलांचा मोहक सुगंध आहे. या थंड हवेने माझे पूर्ण शरीर ताजेतवाने होत आहे. मी प्रेम आणि आनंदाची किरणे सर्वत्र प्रसारित करीत आहे. जवळच कोणीतरी बासरी वाजवत आहे. बासरीची धून कानावर पडताच मला अतिशय शांत वाटते आहे. झाडावर पक्षीही गात आहेत. संपूर्ण वातावरण मला ऊर्जा देत आहे.