पृथ्वी – १

Print Friendly, PDF & Email

पृथ्वी – १

ओळख:

पंच महाभूते ही परमेश्वराची दिव्य अस्तित्वे आहेत. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्यांची परमेश्वर मानून पूजा केली. आपण पृथ्वीला देवी किंवा धरती माता संबोधून तिची पूजा करतो. आपल्या गरजा नियंत्रित करून आणि स्वतःला सत्कर्मात गुंतवून आपण पृथ्वी या घटकाला नेहमी शुद्ध ठेवायला हवे.

गुणधर्म:

पृथ्वीचे पाच गुणधर्म आहेत. ते म्हणजे ध्वनी, स्पर्श, रूप, रस, गंध. पृथ्वी आपल्याला ऊर्जा आणि अन्न देते. केवळ पृथ्वीमुळे आपल्या जीवनाची भरभराट होते. ती आपल्याला सहनशीलता आणि मनाचे व्यापकत्व शिकवते. सर्व हलकी व जड वाहने तिच्यावरून धावतात. आपण खड्डा करतो, जमीन नांगरतो, त्यामुळे तिला त्रास होतो, जखमा होतात; तरीही ती हे सर्व शांततेने सहन करते. तथापि ती बदल्यात आपल्याला अन्न तसेच लाकूड, कोळसा, खनिजे इ. जीवनावश्यक गोष्टी देते.

गोष्ट:

एका फ्रेंच मुलाला पक्षी खूप प्रिय होते, विशेषत्वे, मधुर आवाजाचे लऊ पक्षी. फ्रेंच लोकांना या पक्षाचे मांस खायला आवडत असे.

एकदा या मुलाने लऊ पक्षाचा आवाज ऐकला. त्याने सभोवताली पहिले असता, त्याला एक मनुष्य लऊ पक्षाला पिंजऱ्यात घेऊन, विकायच्या उद्देशाने बसलेला दिसला. मुलाला कल्पना होती की जो कोणी हा पक्षी विकत घेईल, तो त्या पक्षाला मारून खाणार. लऊने त्या मुलाकडे पहिले, जणू काही तो मदतीची याचना करीत होता.

मुलाने त्या माणसाला पक्षाची किंमत विचारली. खिसे चाचपडल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत. तो त्या माणसाला म्हणाला, “आजोबा, माझ्याजवळ आहेत तेवढे पैसे घ्या पण मला हा पक्षी द्या.”

बाहेर हवा खूप गरम होती. तो धावत घरी गेला पण त्याची आई घरी नव्हती. पक्षाला कोणीतरी विकत घेऊन खाऊन टाकेल, अशी त्याला भीती वाटत होती. कमी पडत असलेली रक्कम मिळवण्यासाठी तो शिक्षिकेकडे धावत गेला. शिक्षिकेने लगेच त्याला पैसे दिले. मुलगा धावत परतला, तेव्हा एक स्त्री पक्षी विकत घेण्यासाठी घासाघिस करत होती.

मुलाने पक्षी विकत घेतला. त्याला अतिशय प्रिय असलेल्या पक्षाचा जीव वाचवता आल्याबद्दल त्याला खूप आनंद झाला. त्याने पक्षाकडे पहिले, पक्षी पण कुतूहलाने त्याच्याकडे पाहत होता. त्याने लऊला थोपटले. लऊने पण त्याच्या मधुर आवाजात कृतज्ञता व्यक्त केली. मुलाने पिंजरा शांत जागी नेला आणि त्याचा दरवाजा उघडला. प्रेमाच्या आणि कृतज्ञतेच्या नजरेने पाहत पक्षी आकाशात उडून गेला. मुलाला मिळालेल्या आनंदाची कोण बरे कल्पना करू शकणार?

सुविचार:

“धरती माझी माता आहे: मी धरतीचा पुत्र आहे.”

असे अथर्ववेदात म्हटले आहे, आणि अशी आपली मानसिकता असायला हवी. इथे या विचाराचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी तेच दोन वेळा म्हटले आहे. आपण तेच बोलत राहिलो आणि तशी वृत्ती बाळगली, तर आपण नक्कीच धरती मातेचे रक्षण करू आणि तिला स्वछ आणि सुव्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करू.

स्तब्ध बैठक:

मुलांना खेडेगावात घेऊन जा आणि त्यांना शेताजवळ शांत बसू द्या. त्यांना पुढीलप्रमाणे विचार करून आनंद घेऊ द्या.

  • सर्वत्र झाडेझुडुपे आहेत. सूर्य वर तळपतो आहे आणि वारा हळुवार वाहतो आहे.
  • ट्रॅक्टरने शेत नांगरले आहे, नळीतून पाणी वाहत आहे.
  • दुसरीकडे आपण शेतात कणसे पाहत आहोत, त्या कणसांपासून पीठ होते, ते पीठ मळून त्याची भाकरी इ. गोष्टी बनतात.
  • जीवनावश्यक सर्व गोष्टी आजूबाजूला आहेत. आपल्या गरजेनुसार आपण ते घेऊ शकतो. काहीही साठवून ठेवायची गरज नाही.
  • हे जणू काही सर्वांसाठी प्रेमाचे सुवर्ण शेत आहे. पक्षी आणि प्राणी मुक्त वातावरणात आनंदाने फिरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *