अग्नी – १
अग्नी- १
ओळख:
अग्नी हा घटक प्रकाश देतो. अग्नीला अग्निदेव म्हटले आहे. आपण होम करून, आरती करताना अग्नीची पूजा करतो.
गुणधर्म:
अग्नीचे ध्वनी, स्पर्श आणि रूप हे गुणधर्म आहेत. अग्नी स्वतः जळतो परंतु इतरांना प्रकाश देतो. तो ऊर्जापण परावर्तित करतो. सूर्य पण एक प्रकारचा अग्निगोल आहे. तो ऊर्जा आणि प्रकाश देतो. प्रकाश ज्ञानाचे चिन्ह आहे. प्रकाश अंधार दूर करतो, तसेच ज्ञानाने अज्ञानाचा अंधःकार दूर होतो. अग्नी एखाद्या गोष्टीची अशुद्धता ज्वाळांनी शुद्ध बनवते. उदा. सुवर्ण. म्हणूनच ते शुद्धतेचे चिन्ह आहे. ज्ञानाचा प्रकाश उजळला की तिरस्कार, लोभ, मत्सर इ. दुर्गुण दूर होतात आणि सद्गुण त्यांची जागा घेते. अग्नीची ज्योत नेहमी ऊर्ध्वगामी असते. तसेच आपले विचार नेहमी उच्च, उदात्त आणि आदर्श असावेत.
गोष्ट:
एकदा एक साधूने एका मुलाला त्याच्या वाद्यावर असभ्य सिनेमा गीत गाताना बघितले. साधू थांबले, देवाला उद्देशून मोठ्याने म्हणाले, “हे परमेश्वरा, तू महान आहेस. तुझ्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही.” त्या मुलाने चिडून साधूला त्याच्या वाद्याने डोक्यावर मारले आणि त्यामुळे त्याचे वाद्य तुटले. साधू फक्त हसून तिथून निघून गेले. झोपडीत गेल्यावर साधूने त्यांच्या शिष्याला सर्व घडलेले सांगितले आणि त्या मुलाला वाद्याचे पैसे आणि काही मिठाई देण्यास सांगितले. तसेच, ‘चिडणे हे शरीरासाठी घातक आहे आणि केवळ माझ्यामुळे त्याला राग आला यासाठी आपण माफी मागितली आहे’, असा शिष्याजवळ मुलासाठी निरोपही दिला. हे सर्व बघितल्यावर आणि साधूचा चांगला सल्ला ऐकल्यावर मुलाच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू उभे राहिले. त्याने साधूकडे जाऊन त्यांच्यावर चिडल्याबद्द्ल त्यांची क्षमा मागितली.
सुविचार:
जसा अग्नी प्रखरतेने आणि तेजाने प्रदीप्त होतो, तसेच माझे विचार नेहमी ऊर्ध्वदिशेला जाणारे असावेत.
स्तब्ध बैठक:
मुलांना ताठ आणि शांत बसायला सांगा. नंतर त्यांना खालीलप्रमाणे विचार करण्यास सांगा:
“कल्पना करा की तुमच्यासमोर पेटलेला दिवा आहे. डोळे बंद ठेवून त्या ज्योतीचा प्रकाश तुमच्या भ्रूमध्याशी आणि नंतर मस्तकात आणा. कल्पना करा आणि म्हणा की, जिथे जिथे प्रकाश आहे, तिथे अंधःकार राहू शकत नाही. माझे सर्व वाईट विचार निघून गेले आणि सर्व चांगल्या विचारांनी प्रवेश केला. माझ्या मनात नेहमी चांगले विचार येतील.”
उपक्रम:
कार्डांचे तीन समूह बनवा. मुलांच्या तीन ग्रुपला ते द्या. मुलांना समजून सांगायचे आहे की
१. व्यावसायिक २. ते काय काम करतात ३. ते अग्नीचा कोणता प्रकार वापरतात, असे तीन कार्डांचे समूह आहेत आणि त्यांनी त्याप्रमाणे कार्डांची जुळवाजुळव करायची आहे.
व्यावसायिक | ते काय काम करतात | अग्नीचा प्रकार |
लोहार | लोखंड तापवतात | भट्टी |
पाव बनवणारा | पाव बनवतात | पावाची भट्टी |
सोनार | सोने वितळवतात | चूल |
मुख्य आचारी | जेवण बनवतात | गॅस स्टोव्ह |
भुट्टा विकणारा | भुट्टा भाजतात | कोळशाची शेगडी |
धोबी | कपडे इस्त्री करतात | इस्त्री |
चर्चेचे प्रश्न:
- मानवी शरीरात अग्नी असतो.
(थर्मामीटर तापमान दर्शविते. मरणोत्तर शरीर थंड पडते.) - सूर्यामध्ये अग्नी आहे.
(विशिष्ट काच वापरली जाते किंवा दोन दगड घासून अग्नी पेटवला जातो.) - लाकूड आणि गारगोटीमध्ये अग्नी असतो.
(दोन लाकडे एकमेकांवर घासली वा दोन पाषाण (गारगोटी) एकमेकावर धासले असता अग्नी निर्माण होतो)