अग्नी – २

Print Friendly, PDF & Email
अग्नी – २

ओळख:

शिक्षक एका सहलीची घटना सांगतील. एकदा, एका प्राथमिक शाळेची मुले आपल्या शिक्षकांसोबत गेली. त्यांनी त्यांच्याबरोबर तांदूळ, डाळ, भाज्या असे सर्व जेवणाचे सामान आणि लाकूडफाटा बरोबर नेले. त्यांची सहलीची जागा डोंगराळ भागात होती. तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व सामान बाहेर काढून जेवण बनवण्यासाठी तयारी केली. दुर्दैवाने ते जेवण बनवू शकले नाहीत. काहीतरी न्यायचे राहिले होते. काय बरं होत ते? ती होती आगपेटी.

प्रश्न:
  1. सूर्य कोणी बनवला?
  2. जेवण बनवण्याव्यतिरिक्त इतर कशासाठी अग्नी माणसाची मदत करतो?
  3. तुम्हाला प्रकाशाची गरज कधी भासते?
  4. दिवस प्रकाश कसा मिळतो?
  5. सूर्य जगाला अजून काय देतो?
गाणे:

Fire, Fire burning bright
In the midst of gloomy night
Light is life and darkness death
Gives us energy, light and mirth.

From womb to tomb, fire is friend
Fulfills all the needs till the end
In summer, we feel the scorching heat,
For winter it is a pleasant gift.

Lighter than water spreads everywhere
Purity is its basic nature.

उपक्रम:

चर्चेसाठी खाली प्रश्न दिले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे निरनिराळे गट करून प्रत्येकाला एक प्रश्न द्यायचा आहे. मुलांनी त्यांची उत्तरे लिहून काढायची आहेत. एका मुलाने ते सादर करायचे. ते परिणामकारक होण्यासाठी काही साधनांनी ते प्रदर्शन करू शकतात.

  1. प्रकाशाचे कोणते स्रोत आपण वापरतो?
  2. अग्नीमधे काय जाळतो? का?
  3. अग्नीमधे काय शुद्ध होते?
स्तब्ध बैठक:

मुलांनो! पहाट होते. तुम्ही अंथरुणातून लवकर उठून सकाळची प्रार्थना करता. बाहेर येऊन पूर्व दिशेला उगवत असलेल्या लाल गोलाकार सूर्याला तुम्ही वंदन करता. कल्पना करा, सूर्य, रात्रीचा अंधःकार दूर करून सर्वत्र प्रकाश पसरवत आहे. तुम्हाला उगवत्या सूर्याची ऊब जाणवत आहे. नंतर तुम्ही आंघोळ करता. तुमचे कपडे कोमट पाण्याने धुवून बाहेर उन्हात, वाऱ्यावर वाळायला ठेवता. संपूर्ण दिवस सूर्यदेवाने आपल्याला प्रकाश, उष्णता आणि ऊर्जा दिली. आईने तुम्हाला अग्नीवर बनवलेला गरम नाश्ता दिला. सफाई कामगार येतात आणि पुन्हा न वापरला जाणारा कचरा एकत्र करून तो जाळतात. त्यामुळे तुमचा परिसर स्वच्छ राहतो. त्यानंतर सूर्य माथ्यावर येतो. तुम्ही, आईने अग्नीच्या सहाय्याने बनवलेले दुपारचे चविष्ट जेवण जेवता. संध्याकाळ होते. तुम्हाला चंद्रप्रकाश मिळतो. तुमची सर्व कामे चालू राहण्यासाठी तुम्हाला घरातील सर्व दिवे चालू ठेवायला लागतात. आई देवघरात देवाजवळ समई लावते. उदबत्ती पेटवल्याने घरात सुगंध दरवळतो.

प्रार्थना:

“असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय
ॐ शांतिः शांतिः शांतिः”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: