आकाश – २
आकाश – २
गुरु: ‘प्रिय मुलांनो! आज आपण पंचमहाभुतांविषयी बोलूया. पृथ्वी, जल, अग्नी, हवा आणि आकाश ही निसर्गाची पंचमहाभूते आहेत. हे घटक परमेश्वराने निर्माण केले.’ (गुरु मुलांना ३ घटकांचे नमुने दाखवतात.[पृथ्वी (मातीचा गोळा). जल (शुद्ध पाण्याने भरलेला पेला). अग्नी (मेणबत्ती पेटवली).]
गुरु
“मुलांनो! मी तुम्हाला पाचपैकी तीन घटक दाखवले. पण उरलेले दोन मी दाखवू शकत नाही; तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ते पाहू शकत नाही. पण वाईट वाटून घेऊ नका. मी तुम्हाला या दोन घटकांविषयी पण सांगणार आहे. आपण वायुविषयी बोलू या. आपण श्वासाने शुद्ध हवा शरीरात घेतो आणि अशुद्ध हवा बाहेर सोडतो. याशिवाय आपण जगू शकत नाही.” (गुरु श्वासोच्छ्वासाचे प्रात्यक्षिक दाखवतात आणि मुलांना तसे करण्यास सांगतात.) “जरी उच्छ्वासाने जाणारी हवा तुम्हाला दिसत नाही, पण तुम्हाला त्याचा स्पर्श जाणवतो. तुम्ही वर्गाच्या बाहेर गेलात की तुम्हाला चेहऱ्यावर, हातावर वगैरे हवा फिरताना जाणवते. आता आपण आकाश या घटकाविषयी जाणून घेऊ या. सर्व घटकांमधे आकाश हे अतिशय सूक्ष्म आणि परमेश्वराने सर्वात प्रथम निर्माण केलेला घटक आहे. ध्वनी हे आकाशाचे एकमेव तत्त्व आहे. ते निर्माण करताना सर्व प्रथम ध्वनी आला तो ओम. ह्या ओम ला नादब्रह्म असे म्हणतात. ओम पासून इतर ध्वनी निर्माण झाले. आकाश ह्या घटकापासून वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे इतर घटक पुढे निर्माण झाले.” “समजा मी मोठ्याने ‘राम’ शब्द उच्चारला, (गुरु उच्चारण करून थांबतात). मी उच्चारलेला शब्द तुम्हाला अजून ऐकू येतो का? नाही. हा ‘राम’ चा आवाज कुठे बरं गेला? तो आकाशात विरला. आकाश सर्वत्र असल्याने, ध्वनी आकाशात विरला. जेव्हा आपण भक्तिभावाने ‘ओम’, जो परमेश्वराचा शब्द आहे, त्याचे उच्चारण करू, तेव्हा परमेश्वर खुश होऊन आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य देतो.”
प्रार्थना
ओंकारं बिंदु संयुक्तं
नित्यं ध्यायंति योगिनः
कामदं मोक्षदं चैव
ओंकाराय नमो नमः
भक्ताने भक्तिभावाने उच्चारलेल्या परमेश्वराचे नाम अंतरिक्षात फिरत राहते.
गोष्ट:
“आता मी तुम्हाला आकाश या घटकाचे गुपित समजून घेण्यासाठी एक गोष्ट सांगणार आहे.”
जनाबाई ची गोष्ट
जनाबाई ही एक साधी, मनाने सरळ अशी पांडुरंगाची भक्त होती. ती नेहेमी, अगदी घरातली कामे करत असतानाही, ‘रंग रंग पांडुरंग’ असा भक्तिभावाने नामजप करीत असे. एक दिवस तिने संत नामदेवांकडे तक्रार केली की तिने केलेल्या गोवऱ्या चोरीस गेल्या. नामदेव महाराज जनाबाईस म्हणाले, “तुझ्या गोवऱ्या तू कशा बरे ओळखणार?” त्यावर जनाबाई म्हणाली, “मी नेहेमी देवाचा जप करीत असते. त्यामुळे मी केलेल्या गोवऱ्यांमधेपण देवाचे नाव आहे.” तिने लगेच घरी जाऊन तिने केलेली एक गोवरी आणली आणि ती नामदेव महाराजांच्या कानाजवळ धरली. गोवरीमधून ‘रंग रंग पांडुरंग’ असे शब्द बाहेर पडले. नामदेवांना ते सतत ऐकू येत होते. तरीही त्यांचा विश्वास बसत नव्हता. जनाबाईला त्यांनी दुसरी गोवरी बनवण्यास सांगितले. तिने शेण आणले आणि ‘रंग रंग पांडुरंग’ असे म्हणत, पुन्हा गोवरी बनवली. नामदेवांनी ती कानाजवळ धरली, पुन्हा तेच शब्द कानी पडले. परमेश्वराच्या नामस्मरणाची शक्ती अगाध आहे हे त्यांच्या लक्षात आले.
माणसाचे विचार आणि शब्द सर्वव्यापी आकाशात सदैव तरळतात, जे मानवाचे अस्तित्व कायम राखतात.”
गाणे
मुलांनो, चला तर आता आपण ‘आकाश’ चे गाणे गाऊ या
(गुरु फळ्यावर स्पष्टपणे गाणे लिहितात, आणि गातात. मुले त्यांच्या मागून गातात.)
ॐ ॐ ॐ
आकाशतत्त्वाचा आधार
ॐ ॐ ॐ
आकाशाचा करू उच्चार (1)
आकाश, आकाश आकाश
शोषून घेते ध्वनि, विचार
आकाश, आकाश आकाश
ऐक्य राखते सकल तत्त्वात (2)
आकाशाच्या शुद्धिकरणा
चांगले ऐका, चांगले बोला, चांगले विचार करा
बरसतील ईशकृपेच्या धारा
भीतीस तेथे नसेल थारा (3)
आकाश, आकाश, आकाश
समस्त प्रकाशाचा स्रोत
आकाश आकाश, आकाश,
सकलजनासी करेल मोदित (4)
आकाश, आकाश, आकाश
ईश्वरी देणगी ही अलौकिक
ठेवूनी त्यासी सदैव निर्मल
जीवन तुमचे बनवा उज्ज्वल (5)
उपक्रम
(निसर्ग चित्र ) काढून रंगवणे-
(अ) आकाश, ढग, इंद्रधनुष्य, पक्षी इ.
(ब) गडद आकाश, चांदण्या, चंद्र
स्तब्ध बैठक
डोळे बंद करा आणि या चित्रावर ध्यान करा. निसर्गाकडून आनंद घ्या. “प्रत्येक सुंदर गोष्ट ही चिरस्थायी आनंद असते.”