ईद-उल-फित्र
ईद-उल-फित्र
रमझानच्या अखेरीस अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी चन्द्रदर्शन झाल्यावर ईद-उल- फित्र हा सण साजरा केला जातो.
‘ईद’ म्हणजे आनंद व ‘फ़ित्र’ म्हणजे गरिबांना दानधर्म. ईद-उल-फित्रचा अर्थ आहे दानधर्माद्वारे आनंद मिळवा.”
ह्या उत्सवाच्या दरम्यान केवळ परमेश्वराचे स्मरण केले जात नाही तर गरिबांचेही स्मरण केले जाते. ईद ह्या उतसवाद्वारे ह्या कल्पनेस पुष्टी दिली जाते की जर तुम्ही संपूर्ण समाजाला आनंद देण्यात सहभागी झालात तर तुम्ही व्यक्तिगत आनंद प्राप्त करू शकाल.