समता

Print Friendly, PDF & Email
समता

Janaka wants to be Sukha's disciple.

आपल्याला माहित आहे की राजा जनक राज्यकारभार चालवणे व राज्याच्या गरजांकडे लक्ष पुरवणे ह्यासारख्या सांसारिक कर्तव्यांची पूर्ती करत असताना, तो पूर्णतः त्याचे विचार दिव्यत्वाकडे वळवू शकत होता. एकदा मिथिला नगरीला लागून असलेल्या अरण्यामध्ये महर्षी शुक त्यांच्या शिष्यांना ज्ञानोपदेश देत असल्याचे जनकास समजले. *त्यालाही शुकांचे शिष्यत्व पत्करून त्यांचा ज्ञानोपदेश ऐकण्याची इच्छा होती. जनक अरण्यात गेला. शुकांना अभिवादन करुन त्याने शुकांना विचारले की त्यांच्या असंख्य शीष्यांसमवेत ते त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करतील का आणि त्याने वर्गात हजर राहण्याची अनुमती देण्याची विनंती केली.* त्या दिवसापासून जनक त्यांच्या शिष्यांप्रमाणे आचरण करु लागला. एक दिवस त्याला वर्गामध्ये येण्यास उशीर झाला. तो येईपर्यंत शुकांनी वर्ग सुरु केला नाही. व त्याला उशीर होण्यास काही कारण असल्याचे त्यांनी इतर शिष्यांना सांगितले.

Disciples were made to feel city in fire

जनक येईपर्यंत प्रतीक्षा करावी असे इतर शिष्यांना सांगितल्यावर त्यांच्यामध्ये कुजबुज सुरु झाली. त्यांच्या एकमेकांमध्ये असे बोलणे चालले होते की शुकमहर्षी राजे महाराजे वा प्रभावी लोकांना महत्त्व देणार नाहीत, ह्या विश्वासाने ते त्यांच्याकडे आले होते. त्या दिवसापासून त्यांची गुरुवरची श्रद्धा डळमळीत होऊ लागली. त्यांना जनक राजाची असूया वाटू लागली.

Except Janaka all others running

जेव्हा शुकांनी त्यांच्यामधील असूया पाहिली तेव्हा त्यांनी त्यांच्या शिष्यांना धडा शिकवण्याचे ठरवले. योग्य संधी मिळताच, त्यांनी सर्व शिष्यांना मिथिलानगरीस आग लागल्याचे भासवले. सर्व शिष्यगण आपापल्या घराचे काय झाले असेल या विचाराने बचाव करण्यासाठी नगराकडे धावत सुटले. जनक राजा मात्र आपल्या जागेवरून जरासुद्धा हालला नाही. त्याच्या चेहऱ्यावर हसू होते. त्याच्या मनात विचार होते ‘ईश्वरेच्छा बलियसी!’ कोणीही त्यामध्ये बदल करु शकत नाही. नगराकडे धावत गेलेल्या मत्सरी शिष्यांना तेथे गेल्यावर आग न लागल्याचे दिसले. त्यांना फक्त तसे भासवण्यात आले होते. त्यानी परत येऊन शुकांना सर्व हकीकत सांगितली. जनकाच्या स्थिर मनाविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्या मत्सरी शिष्यांकडे पाहून त्यांनी त्यांना सांगितले की मनाचे स्थैर्य नसणारे अनेक शिष्य असण्यापेक्षा एक शिस्तबद्ध शिष्य असणे केव्हाही चांगले.

प्रश्न
  1. महर्षी शुकांच्या शिष्यांना जनकाची असूया का वाटत होती?
  2. शुकांनी त्यासाठी कोणती योजना आखली?
  3. जनकाने काय केले?
  4. शिष्यांनी काय केले?

[स्त्रोत- Stories for children-II
प्रकाशक- SSSBPT Prashanti Nilayam]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: