संतुलन
संतुलन
उद्दिष्ट:
हा एक मनोरंजक सांघिक उपक्रम आहे जो, कोणत्याही परिस्थितीत मनाचे समतोलत्व राखून संतुलित राहण्याच्या महत्त्वावर विशेष जोर देतो.
संबंधित मूल्ये:
लक्ष केंद्रित करणे
मनाची स्थिरता
दृढनिश्चय
साहित्य:
२ सारख्या आकाराची आणि सारख्या वजनाची पुस्तके
गुरुंसाठी पूर्वतयारी:
काही नाही
खेळ कसा खेळावा
- गुरुंनी तिच्या वर्गातील मुलांचे दोन गट करावे आणि दोन्ही गटातील एका मुलाला एक एक पुस्तक द्यावे.
- त्यानंतर गुरुंनी अ गटातील मुलाच्या डोक्यावर पुस्तक ठेवावे आणि एक अंतिम स्थान निश्चित करुन त्याला त्या स्थानापर्यंत डोक्यावरील पुस्तकास हात न लावता जाण्यास सांगावे.
- ब गटातील मुलासाठी वरील मुद्द्याची पुनरावृत्ती करावी.
- जर दोन्ही गटातील मुले पुस्तक खाली न पाडता अंतिम स्थानापर्यंत पोहोचली तर त्यांना गुण द्यावेत.
- उरलेल्या मुलांबरोबर असाच खेळ सुरु ठेवावा.
- ज्या गटातील मुलांचे गुण अधिक तो गट विजयी
गुरुंना सूचना:
- नारदमुनींनी डोक्यावर तेलाचे भांडे ठेवून केलेली विश्वप्रदक्षिणा.
- ज्यांनी एकाग्रता, दृढ़ता आणि समता ह्यांच्या सहाय्याने अखेरीस विजय प्राप्त केला अशा थोर व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग.