प्रशांती वाहिनितील उतारा

Print Friendly, PDF & Email
प्रशांती वाहिनितील उतारा
प्रशांती वाहिनी मध्ये स्वामी म्हणतात

परमेश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठीही मनुष्याचे ठायी शांती व सबुरी असणे जरूरी आहे. केवळ शांततेमुळे साधनेचे फळ प्राप्त होते. तुम्ही दिवसरात्र ज्या कार्यात व्यस्त आहात त्या ठिकाणी हा धडा आचरणात आणा.

“असतो मा सद्गमय;
तमसो मा ज्योतिर्गमय;
मृत्योर्मा अमृतं गमय,”

हा शांती मंत्र आहे. वेगवेगळ्या लोकांनी ह्या मंत्राचा वेगवेगळा अर्थ दिला आहे, काहींनी तपशीलवार तर काहींनी अत्यंत रसाळ भाषेत.

  • “हे प्रभू, जेव्हा मी ह्या जगतातील वस्तूद्वारे आनंद प्राप्त करतो तेव्हा मला असत, अशाश्वत वस्तूचे विस्मरण करून तुम्ही मला शाश्वत आनंदाचा मार्ग दाखवा” – ही पहिली प्रार्थना आहे.
  • “हे प्रभू, जेव्हा या जगतातील वस्तू मला भुरळ घालतात तेव्हा तू सर्व व्यापी आत्म्यास झाकून टाकणाऱ्या वस्तुरूपी अंधःकारास दूर कर” – ही दुसरी प्रार्थना आहे.
  • “हे प्रभू, तुझ्या कृपेने तू मला अमरत्व व परमानंद प्रदान कर, जो मूलतः प्रत्येक वस्तूमध्ये विद्यमान असणाऱ्या आत्म्याच्या तेजाच्या जाणीवेतून फलित होतो” – ही तिसरी प्रार्थना आहे. हा ह्या मंत्राचा खरा अर्थ आहे.

सच्चा भक्त निरंतर परमेश्वराच्या चिंतनात मग्न असतो. त्याला त्याचे हित जाणण्यासाठी व चिंता करण्यासाठी वेळच नसतो. त्याच्या मनामध्ये केवळ ‘परमेश्वर प्राप्ती’ ही एक आणि एकच संकल्पना असते. उदाहरणाशिवाय हे समजणे अवघड आहे. आई दिसली नाही की लहान बालक भयभीत होऊन ‘आई, आई’ म्हणत तिला शोधत इकडे तिकडे धावते. आई येते व त्याला हातात उचलून मांडीवर घेते. लगेचच मूल रडायचे थांबते. त्याची भीती नाहीशी होते परंतु ते लहान बालक त्याची आधीची भयभीत अवस्था व नंतरची दिलाश्याची अवस्था ह्यामधील फरक मोजू किंवा शोधू शकतो का? नाही. व तसे करणे आवश्यकही नाही.

त्याचप्रमाणे जो सदैव प्रभूची सेवा करण्याची संधी शोधतो तो स्वतःला त्यामध्ये बुडवून टाकतो आणि जेव्हा ती सुवर्णसंधी येते त्यावेळी त्याला कोणतीही चिंता व पीडा विचलित करू शकत नाही. केवळ प्राप्तीच्या क्षणापर्यंत चिंता व पीडा तुम्हाला त्रास देतात. त्यानंतर संपूर्ण चित्त अनुभवाकडे वळवले जाते व अगोदरच्या संघर्ष व पिडांचा विसर पडतो.

Ref: http://saibaba.was/vahini/prashanthivahini.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: