गणेश चतुर्थी
गणेश चतुर्थी
भारतीय लोक जे जे उत्सव व सण साजरे करतात ते आध्यात्मिक व सामाजिक दृष्टया अर्थपूर्ण असतात. प्रत्येक उत्सव ही जणू दैवी शक्तीने भरलेली घटना आहे असेच मानले जाते. अशा पवित्र दिवशी प्रत्येक घर स्वच्छ केले जाते. शरीरशुध्दीसाठी प्रत्येक व्यक्ती अभ्यंगस्नान करते. विशेष पूजा केल्या जातात, देवतेला नारळ अर्पण केला जातो आणि दिवसभर प्रार्थना केली जाते.
गणेश चतुर्थीचे महत्व वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या पद्धतींनी स्पष्ट केले आहे. गणपतीच्या मूर्तीचा अर्थ असा – त्याला हत्तीचे मस्तक दिले आहे कारण हत्ती हा प्राणी विलक्षण बुध्दिमत्ता, विवेक व ज्ञान यासाठी प्रसिध्द आहे. हत्ती हा नेहमी अतिसावध असतो व त्याला भोवतालच्या वातावरणाची प्रकर्षाने जाणीव असते. त्याची स्मृतीही पक्की असते. तो घनदाट अरण्यातून मोठ्या रुबाबात हिंडत असतो. तो एखाद्या ठिकाणाहून गेला की इतरांना आपोआप मार्ग तयार होतो. तो इतरांना पथप्रदर्शक ठरतो पण त्याची त्याला जाणीव नसते कारण तो त्याचा सहजस्वभाव आहे. गणपती सगळ्यांना मार्गदर्शन करतो. गणपतीचे वर्णन ‘बुध्दिविनायक’ व”सिद्धिविनायक’ असे केले जाते. “विनायक” या शब्दाचा अर्थ अजोड नेता असा आहे (वि म्हणजे विशेष, नायक म्हणजे नेता) तो गणांचा मुख्य आहे आणि म्हणूनच गणपती म्हणून माहीत आहे. रुद्रगण, भद्रगण आणि इतर गणांचा तो अधिपती आहे. मानवी शरीराच्या आतील व बाहेरील सर्वदिव्य शक्तीचा तो प्रभू आहे.
जेव्हा व्यासमहर्षींनी त्याला महाभारत लिहिण्याची विनंती केली तेव्हा गणेशाने क्षणाचाही
विलंब न लावता ते कबूल केले. इतकेच नव्हे तर लेखणी मिळविण्यासाठी वेळ न घालवता
आपला तीक्ष्ण दात मोडून हातात घेतला आणि तो लिहावयास तयार राहिला. याप्रमाणे तो
सदैव दुसऱ्यांच्या उपयोगी पडावयास तयार असतो
विनायक है बुध्दिसिध्दीचे मूर्तिमंत रूप आहे. गणेशपूजेचे महत्त्व कोणते? जीवनाच्या प्रवासात माणसांना बऱ्याच विघ्नांना सामोरे जावे लागते ही विघ्ने कमीत कमी करण्यासाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी गणपतीची प्रार्थना केली जाते. कारण तो विघ्नेश्वर म्हणून ओळखला जातो सर्व पंथातील लोकं गणपती ही देवता महत्त्वाची मानतात, कोणत्याही धर्मकार्यात त्याची प्रथम पूजा केली जाते. विश्वातील सर्व काही भगवान शंकरांनी व्यापलेले आहे. हे सत्य त्याने प्रस्थापित केले. तो आणि त्याचा भाऊ सुब्रम्हण्य यांच्यात पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा लागली असताना मातापित्याना प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्याचा दावा त्याने केला.
देवाचे आवाहन, प्रतिष्ठापन आणि आराधना करीत असताना गणेश अग्रभागी असतो, म्हणून या उत्सवानंतर देवाच्या इतर रुपांच्या उत्सवांची रांगच सुरु होते. नवरात्री, दीपावली, संक्रांती व शिवरात्री हे सर्व उत्सव गणेशोत्सवानंतर येतात. या पवित्र दिवशी गणेशाच्या रुपाने साकार झालेल्या वैश्विक शाश्वत सत्याचे चिंतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गणपतीची शुचितेने व श्रध्देने करने पूजा करून त्याच्या कृपेसाठी प्रार्थना करावयाची आहे. कारण त्यामुळे उच्चतम ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी करावयाच्या सर्व प्रयत्नांमधील अडचणी टळू शकतात व प्रगती साध्य होते.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश उत्सव साजरा केला जातो. याला ज्योतिषशास्त्राचाही आधार आहे. याच रात्री हत्तीच्या मस्तकाचा आकार असलेले नक्षत्र खूपच तेजःपुंज असे दिसते हत्तीचे रुंद मस्तक असेही दर्शविते की देव त्याच्याभक्ताच्या कृत्यांबाबत कार्याबाबत मोठ्या मनाचा, सहिष्णु व सहानुभूती बाळगणारा आहे.
मानव हा तीन प्रकारच्या प्रवृत्तींनी बांधलेला आहे. काम, क्रोध, लोभ. पहिली प्रवृत्ती कामना. कामनापूर्ती झाली नाही तर दुसरी प्रवृत्ती क्रोध डोके वर काढते. परंतु कामनापूर्ती झाली, म्हणजे पाहिजे ती गोष्ट प्राप्त झाली, की तिसरी प्रवृत्ती लोभाची, मोहाची, प्रवृत्ती मानवाचा ताबा घेते. जेव्हा कामना हितकारक, कल्याणकारक असते, तेव्हा देव कृपा वर्षाव करतो. गणेशाला काम क्रोध-लोभ नाहीत. जे कोणी चांगली व दिव्य ध्येये गाठण्याचा प्रयत्न करतात, त्या सर्वाना गणेशाची कृपा लाभते.
गणेशाने निवडलेले वाहन पहा– उंदीर! उंदीर हा प्राणी असा आहे की जो वासनांमुळे(वस्तुच्या वासनेनी) स्वतःचा नाशही ओढवून घेतो. अशीच सर्व माणसेही वासनांचा बळी ठरतात. परंतु मनुष्याला वाईट मार्ग दाखविणाऱ्या आणि त्यामुळे दुर्दैव निर्माण करणाऱ्या वासना गणेश दडपून टाकतो. त्याचप्रमाणे एवढा महाकाय गणपती इवल्याशा उंदरावर बसून फिरतो आणि तरीही उंदीर चिरडला जात नाही यावरुन हे स्पष्ट होते की आकार हा लहान मोठा कसाही असो जीव किंवा आत्मा सर्वांच्या ठिकाणी सारखा असतो. आकार हा महत्वाचा नसतो तर जीव, आत्मा महत्त्वाचा असतो. तिसरी गोष्ट म्हणजे उंदीर हे क्रोध, गरज, स्वार्थीपणा व लोभ यासारख्या दुर्गुणांचे प्रतीक आहे. उंदीरावर आरूढ होऊन गणपतीदेवाने स्पष्ट केले आहे. की सर्वांनी वरील दुर्गुणांना असे ताब्यात ठेवले पाहिजे उंदराचा सन्मान झाल्यामुळे गणेशपूजेत त्याचा भाग असतो. वाहन, अलंकार, उपकरण, सेवक असा कोणत्याही प्रकारे परमेश्वराशी संबंध आला की त्या वस्तू, प्राणी वा माणसे यांनाही विशेष.
पवित्र अशी प्रतिष्ठा प्राप्त होते. हत्ती, सिह. गरुड, नाग हे सगळे आणि इतरही अनेक या त-हेने पवित्र झाले आहेत.
गणेशाचे चार हात देवाच्या अलौकिक शक्तीची चिन्हे आहेत, देवी शक्तीची प्रतीके आहेत.
गणेशाला दोन दृश्य हातांशिवाय दोन अदृश्य हातही आहेत. श्रीगणेश या अदृश्य हातांचा वापर.
भक्तांचा आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचे संकटापासून रक्षण करण्यासाठी करीत असतो, त्यांना योग्य मार्गाला लावण्यासाठी करीत असतो. त्याच्या एका हातात पाश आहे. त्याचा उपयोग भक्तांची मने आकर्षित करुन देवापाशी पोहोचण्याच्या योग्य मार्गाला लावण्यासाठी तो करतो. दुसऱ्या हातात तो अंकुश धारण करतो. त्याचा उपयोग तो भक्तांचे अज्ञान दूर करण्यासाठी करतो आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी त्याला टोचणी देतो. तिसऱ्या’ हातात मोदक आहे. भक्तांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठीची ती मिठाई आहे आणि जे भक्त आनंदाची माधुरी चाखण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्यासाठी ते पारितोषिक असते. चौथ्या हाताने तो सगळ्या देवभकतांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे वर देतो.
गणेशाचे कान मोठे असतात. त्यामुळे तो भक्तांच्या सर्व प्रार्थना ऐकू शकतो आणि खरे-खोटे यामधील फरक करु शकतो त्याचे विशाल उदर सारे जग त्यात सामावले आहे असे दर्शविते.
गणेशावर सोपविलेली आणखी एक भूमिका पाहा जेव्हा शिव सर्वोच्च भावावस्थेत जातो आणि ती भावावस्था अंतिमतः नटराजाच्या तांडव नृत्याच्या दारे प्रकट होते, तेव्हा स्वर व ताल यांचा प्रभू असलेला गणेश मृदंग वाजवून ताल धरतो. सर्व देवांच्या अगोदर गणेशदेवाची पूजा केली असता, गणेशदेव प्रसन्न होतात, यात आश्चर्य ते कोणते?
[सनातन सारथी ऑक्टो ८५/ ऑक्टो १९८७ आणि बालविकास नियतकालिक मे/ ऑगस्ट ८७]