गायत्री मंत्र – उपक्रम
गायत्री मंत्र – उपक्रम
- पेन्सिल, झाडाची, कुत्र्यांची चित्र, पुस्तके, बॉल इ. ह्यासारख्या आपल्या घरामध्ये, शाळेत वा बालविकास वर्गात वापरल्या जाणाऱ्या वा पाहायला मिळणाऱ्या ३०/३२ वस्तु जमा करा.
- त्यातील २० वस्तु निवडून जमिनीवर वा टेबलावर मांडा। त्यावेळी उरलेल्या १० वस्तुंचा वापर करू नका.
- मुलांना ३० ते ४० सेकंदासाठी त्या २० वस्तू जवळून पाहण्यास सांगा.
- आता त्या २० वस्तु तेथून हलवा किंवा कापड़ाने झाकून ठेवा.
- मुलांना त्यांनी पहिलेल्या सर्व वस्तूंची यादी करण्यास सांगा. त्यातील कदाचित काही वस्तूंचे त्यांना स्मरण राहील. ज्यांची निरिक्षण शक्ती व स्मरणशक्ती तल्लख आहे, त्यांच्या १५ वस्तूंची नावे स्मरणात राहतील.
- आता मुलांना पूर्ण एकाग्रतेने ३ वेळा गायत्री मंत्र उच्चारण्यास सांगा.
- आता उरलेल्या १० वस्तू घ्या ज्या आगोदर मांडल्या नव्हत्या. व आगोदर मांडलेल्या २० वस्तूंपैकी १० वस्तू निवडा आता आपल्याकडे एकूण २० वस्तु आहेत, (२० मधून १० बाजूला काढलेल्या वस्तू + आगोदर न मांडलेल्या १० वस्तू) आता ह्या २० वस्तू जमिनीवर वा टेबलावर मांडा
- ४थ्या पायरीप्रमाणे, मुलांना ३०-ते ४० सेकंडासाठी त्या वस्तूंचे जवळून अवलोकन करण्यास सांगा.
- त्यानंतर ५ व्या पायरीप्रमाणे त्या वस्तू तेथून हलवा किंवा कापड़ाने वा ब्लॅंकेटने झाकून ठेवा.
- आता मुलांना त्यांनी पाहिलेल्या सर्व वस्तू आठवण्यास सांगा.
उपक्रमाचे मूल्यमापन
गायत्री मंत्र हा अत्यंत शक्तीशाली मंत्र आहे. ह्या मंत्राच्या उच्चारणाने मन केंद्रीत व एकाग्र होते तसेच स्मरणशक्ती वाढते. गायत्री मंत्राचे उच्चारण केल्यानंतर, दुसऱ्या वेळेस मुलांनी लक्षात ठेवलेल्या वस्तूंचा आकडा जास्त असेल. ज्या मुलांच्या वस्तूंच्या पहिल्या व दुसऱ्या वेळेच्या आकड्यात फरक पड़ला नसेल, तर त्यांच्याकडून अधिक वेला गायत्री मंत्राचे उच्चारण करून घेऊन त्यांना अधिक संधी द्याव्यात.
हा एक अत्यंत अद्भुत उपक्रम आहे. ज्याद्वारे मुलांना गायत्री मंत्रोच्चारणाने काय लाभ होतो ते समजते व ते दररोज नियमितपणे त्याचे उच्चारण करू लागतात.