गीतांजली

Print Friendly, PDF & Email
गीतांजली
उद्दिष्ट:

मजेत खेळल्या जाणाऱ्या या उपक्रमातून, गीतेचे आधी शिकलेले श्लोक आठवण्याची संधी मुलांना दिली जाईल, तसेच त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत करणे हा उद्देश आहे

संबंधित मूल्ये:
  • उत्सुकता
  • निरीक्षण
  • एकाग्रता
  • स्मरणशक्ती
  • चिकाटी/ सावधानता
  • अचूकता
  • आत्मसमाधान
पूर्वतयारी
  • गुरुंनी यासाठी गीताश्लोकांची निवड करावी
  • गुरु पुठ्ठयांची वीस कार्डे तयार करतील. (खेळातील पत्त्यांच्या आकाराची )
  • दहा कार्डांचा एक संच निळा तर दहा कार्डांचा दुसरा संच गुलाबी रंगाचा असेल
  • गुरुंनी निवडलेल्या १० श्लोकांची पहिली ओळ १० निळ्या कार्डांवर लिहावी आणि त्याच श्लोकांची दुसरी ओळ गुलाबी कार्डांवर लिहावी.
  • कार्डांच्या मागच्या बाजूला स्वामींचा फोटो चिकटवावा
  • कार्डे रंगीत व आकर्षक दिसली पाहिजेत. ( यांत स्वामींच्या पॉकेट कैलेंडरची वीस कार्डे घेऊन त्यामागे सुध्दा श्लोक लिहिले तरी चालेल)
  • एवढे झाल्यावर कार्डे तयार झाली.
खेळ कसा खेळायचा
  1. गुरुंनी कार्डे वर खाली पिसावी.
  2. नंतर गुरुने ती एका ओळीत पाच, याप्रमाणे ४ ओळीत मांडावी (कोठेही कोणताही रंग आला तरी चालेल)
  3. कार्डे अशा पद्धतीने ठेवावी की श्लोक लिहिलेली बाजू पाठीमागे असेल. (दिसणार नाही)
  4. एका वेळी चार मुले खेळ खेळू शकतील.
  5. प्रत्येक मूल एका वेळी २ कार्डे उचलेल त्यांतील एक निळे व एक गुलाबी असेल व श्लोकांतील दोन ओळी जुळत आहे का, ते पाहील.
  6. दोन्ही ओळी जुळल्या तर तो त्या मोठ्याने वाचेल व कार्डांची जोडी स्वतःकडे ठेवेल. आणि त्याला खेळण्यासाठी आणखी एक संधी मिळेल.
  7. जर श्लोकाची जोडी जुळली नाही, तर तो ती कार्डे इतर सर्व मुलांना दाखवेल आणि नंतर पुन्हा त्याच जागी ठेवेल.
  8. आता दुसऱ्या मुलाची खेळायची पाळी असेल. याप्रमाणे जोपर्यंत दोन्ही सेटमधील सर्व जोड्या जुळत नाहीत, तोपर्यंत खेळ पुढे चालू राहील.
काही बदल:
  • गीता श्लोक व त्यांचा अर्थ अशा जोड्या घेता येतील.
  • तसेच श्लोकांचा पहिला व शेवटचा शब्द घेऊन (२ कार्डांवर लिहून) हा खेळ खेळता येईल.
गुरुंसाठी सूचना:

पलब्ध वेळ व मुलांची कठिण समस्या सोडवण्याची क्षमता यानुसार गुरुंनी खेळात श्लोकांच्या किती जोड्या घ्यायच्या हे ठरवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *