हरित क्रांती

Print Friendly, PDF & Email
हरित क्रांती
उद्दिष्ट:

पर्यावरणाचे आपल्याला इतके फायदे आहेत की आपण ह्या जन्मात तिचे ऋण फेडू शकणार नाही. मुलांनी ते पुढील पिढ्यांसाठी व्यवस्थित सांभाळून जतन करावे. यासाठी मुलांनी छोटी छोटी पावले उचलावीत अशी त्यांना जाणीव करुन द्यायला हवी.

‘हरित क्रांती’ ह्या उपक्रमामुळे पर्यावरणविषयी काळजी वहायला लागतात.

संबंधित मूल्ये
  • जाणीव
  • सहानुभूती
  • निसर्गाविषयी प्रेम
  • निर्णय क्षमता
  • जबाबदारी
  • चांगले नागरिकत्व
वस्तूंची आवश्यकता:
  1. चिठ्ठ्यांचे दोन समूह
  2. समूह अ- आपण पर्यावरण कसे प्रदूषित करतो?
  3. समूह ब- आपण पर्यावरण कसे वाचवू शकतो?
  4. एक काळी कचराकुंडी
  5. एक हिरवे टोपले
खेळ कसा खेळावा
  1. गुरुने मुलांचे दोन ग्रुप करावेत, आणि त्यांना सरळ रांगेत समोरासमोर तोंड करुन उभे करावे.
  2. गुरुने मुलांसमोर काळी व हिरवी कचराकुंडी ठेवावी.
  3. सर्व वीस चिठ्ठ्या मुलांमध्ये वाटून द्याव्या.
  4. गुरुने मुलांना खेळ समजून सांगावा की एक एक मुलाने आपल्या चिठ्ठीवरील सन्देश वाचून दाखवावा आणि कोणत्या कुंडीत चिठ्ठी टाकायचे हे ठरवावे.
  5. उदा.- गुरुने एका चिठ्ठीवरील संदेश वाचावा – ‘प्लास्टिक पिशवीचा वापर’ आणि ही चिठ्ठी काळ्या कुंडीत टाकावी.
  6. उपक्रमाच्या शेवटी मुले पर्यावरणाचे प्रदूषण कसे टाळता येते आणि त्यांच्या छोट्या छोट्या कृतींमधून ते पृथ्वीचे कसे संरक्षण करु शकतात हे शिकतात.
काळी कचराकुंडी – पर्यावरण प्रदूषित करणे
  1. प्लास्टिक बाटल्यांचा वापर
  2. भोंग्याचा आवाज
  3. धान्याची सुकलेली रोपे शेतात जाळणे.
  4. मातीची धूप
  5. मध्यरात्री लाऊडस्पीकर लावणे.
  6. समुद्रात तेल ओतणे
  7. धूम्रपान
  8. दात घासताना पाण्याचा नळ चालू ठेवणे
  9. शिकार करणे
  10. कारखान्यांचा धूर
  11. जंगलतोड
  12. नद्यांचे प्रदूषण
हिरवी कुंडी -पर्यावरणाचे संरक्षण
  1. पुनर्प्रक्रिया केलेल्या वस्तूंचा उपयोग करणे
  2. कापडाच्या पिशवीचा वापर
  3. गळत असलेले नळ दुरुस्त करणे
  4. रोपे भेट देणे
  5. सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडया ठेवणे
  6. गॅसवर चालणाऱ्या वाहनांचा वापर
  7. आवश्यकता नसताना दिवे बंद करणे.
  8. फटाके वाजवू नयेत.
  9. शॉवरचा कमी वापर
  10. आजूबाजूस झाडांची लागवड करणे
  11. वीज उपकरणे वापरात नसताना स्विच बंद ठेवणे.
गुरुंसाठी सूचना:

या उपक्रमाबरोबरच चर्चासत्र आणि वृती चाचणी देखील घेता येईल. उदा.-

तुमच्या मित्र/मैत्रीणीच्या वाढदिवसासाठी तुम्ही देऊ इच्छिता- a)एखादी महागडी भेटवस्तु ब) रोपटे क) पर्यावरणावर लिहिलेले पुस्तक .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: